प्रशासक समिती शास्त्रीसह करणार चर्चा

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्यामुळे दौ-यानंतर प्रशासकांची समिती (सीओए) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 01:27 AM2018-09-10T01:27:36+5:302018-09-10T01:27:54+5:30

whatsapp join usJoin us
Regarding discussions with the administrator committee Shastri | प्रशासक समिती शास्त्रीसह करणार चर्चा

प्रशासक समिती शास्त्रीसह करणार चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्यामुळे दौ-यानंतर प्रशासकांची समिती (सीओए) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
भारताला वन-डे सामन्यांच्या मालिकेव्यतिरिक्त कसोटी मालिकेतही पराभव स्वीकारावा लागला. पाचव्या कसोटी सामन्यानंतर सीओए संघाच्या कामगिरीचे आकलन करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाºयाने सांगितले की, ‘सीओएची ११ सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होईल. मुख्य चर्चा नवी घटना लागू करण्यावर होणार आहे, पण निश्चितच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेवरही चर्चा होईल.’
अधिकारी पुढे म्हणाले, ‘रवी शास्त्री यांची वैयक्तिक भेट घ्यायची की त्यांच्याकडून लिखित अहवाल मागवायचा, हा निर्णय सीओएला घ्यायचा आहे. सध्या क्रिकेट सल्लागार समिती काम करीत नाही. निवडणूक होईपर्यंत प्रभार सीओएकडे आहे.
जर बैठक झाली तर निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांचेही मत जाणून घेण्यात येईल. अधिकारी यांनी पुढे म्हटले की, ‘व्यवस्थापकाचा अहवाल हा औपचारिक असतो. सुनील सुब्रमण्यम यांची जबाबदारी पूर्णपणे प्रशासकीय आहे. त्यांच्याकडे निवास व्यवस्था, आवडीचे भोजन, प्रवास, सरावासाठी परिस्थिती याबाबतची जबाबदारी होती. सुब्रमण्यम यांना कुठल्या अन्य बाबीवर लिहिण्याचा अधिकार नाही. क्रिकेटबाबतचे उत्तर शास्त्री, कोहली किंवा एमएसके यांच्याकडे मागितले जाईल.’ (वृत्तसंस्था)
>अहवाल मागवणार
बीसीसीआयचे अन्य एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणाले, ‘पाठीच्या दुखापतीनंतरही भुवनेश्वरला तिसºया वन-डे सामन्यात खेळण्यासाठी बाध्य करण्यात आले का? साऊथम्पटन कसोटीदरम्यान रविचंद्रन अश्विन पूर्णपणे फिट होता का ? दोन्ही खेळाडूंबाबत अधिकृत अहवालामध्ये दुखापत बळावली असे नमूद होते. त्यामुळे त्यांना पूर्वीच दुखापत होती, हे स्पष्ट होते. त्यामुळे सीओए हा अहवाल मागवतील, अशी आशा आहे.’

Web Title: Regarding discussions with the administrator committee Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.