Official: ICC World Cup 2019 : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध भगव्या जर्सीत दिसणार, बीसीसीआयची घोषणा

ICC World Cup 2019;भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध निळ्या जर्सीत नाही तर भगव्या जर्सीत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अखेर अधिकृत घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 06:20 PM2019-06-28T18:20:27+5:302019-06-28T18:24:19+5:30

whatsapp join usJoin us
Official : ICC World Cup 2019; BCCI release India’s away orange kit for upcoming England match | Official: ICC World Cup 2019 : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध भगव्या जर्सीत दिसणार, बीसीसीआयची घोषणा

Official: ICC World Cup 2019 : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध भगव्या जर्सीत दिसणार, बीसीसीआयची घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध निळ्या जर्सीत नाही तर भगव्या जर्सीत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अखेर अधिकृत घोषणा केली. भारतासाठी निळी जर्सी लकी असल्याचेही काही जण म्हणतात. पण आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला निळ्या जर्सीने खेळता येणार नाही. भारत आणि इंग्लंड यांचा सामना 30 जूनला होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ 'ऑरेंज जर्सी' परीधान करणार आहे. आतापर्यंत या 'ऑरेंज जर्सी'बाबत बरीच चर्चा झाली. पण या 'ऑरेंज जर्सी'चा लूक नेमका कसा असेल, हे कोणालाही माहिती नव्हते. पण आज या 'ऑरेंज जर्सी'चे अनावरण करण्यात आले आणि तिचा पहिला लूक पाहायला मिळाला.



आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) होम-अवे फॉरमॅटनुसार भारतीय संघाला दुसरी जर्सी तयार ठेवण्यास सांगितले होते.  भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सीचा रंग निळा आहे. त्यामुळे एका संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागेल. पण यावेळी भारतानेच का जर्सीचा रंग बदलायचा, इंग्लंडने आपल्या जर्सीचा रंग बदलावा, असे काही जणांचे म्हणणे आहे. पण नियमानुसार यजमान संघाच्या जर्सीचा रंग बदलला जात नाही. त्यामुळे इंग्लंडला यामधून सुट मिळाली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा संघ निळ्या जर्सीमध्येच उतरणार आहे.

आतापर्यंत भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत  निळ्या रंगाच्या शेड्सच्या जर्सी परीधान केल्या आहेत.  पण इंग्लंडचीही जर्सी निळ्या रंगाची असल्यामुळे भारताला त्यांच्यी जर्सीचा रंग बदलावा लागणार आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ निळ्या रंगाची जर्सी परीधान करत असला तरी कॉलर मात्र ऑरेंज रंगाची आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ही रंगसंगती उलटी झाली आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाच्या जर्सीचे हात ऑरेंज रंगाचे, तर कॉलर निळ्या रंगाची आहे.
 

Web Title: Official : ICC World Cup 2019; BCCI release India’s away orange kit for upcoming England match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.