मुंबईसाठी आज ‘करा किंवा मरा’, किंग्स इलेव्हन पंजाबचे तगडे आव्हान

गतविजेता मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ‘करा किंवा मरा’ या इराद्यासह उतरणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:41 AM2018-05-04T00:41:10+5:302018-05-04T00:41:10+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai's 'Kar or Mara', a tough challenge for Kings XI Punjab | मुंबईसाठी आज ‘करा किंवा मरा’, किंग्स इलेव्हन पंजाबचे तगडे आव्हान

मुंबईसाठी आज ‘करा किंवा मरा’, किंग्स इलेव्हन पंजाबचे तगडे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंदूर : गतविजेता मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ‘करा किंवा मरा’ या इराद्यासह उतरणार आहे. सामना जिंकायचा झाल्यास मुंबईला फलंदाजी आणि गोलंदाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. तीन वेळेचा आयपीएल चॅम्पियन मुंबईने यंदा आठपैकी केवळ दोनच सामने जिंकले. त्यामुळे त्यांच्यावर स्पर्धेबाहेर पडण्याचे संकट घोंघावत आहे.
दुसरीकडे आश्विनच्या नेतृत्वाखालील पंजाबने सातपैकी पाच सामने जिंकले. त्यांचा प्ले आॅफमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांनी आठवडाभराच्या विश्रांतीनंतर स्वत:ला सज्ज केले असेल. किंग्स पंजाबच्या खेळाडूंनी पर्पल किंवा आॅरेंज कॅप जिंकली नसली तरी सांघिक कामगिरीच्या बळावर हा संघ वाटचाल करीत आहे. आयपीएल लिलावात पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेला गेल चवताळलेल्या वाघासारखा खेळत आहे. आतापर्यंत त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह २५२ आणि राहुलने २८८ धावा केल्या. फिरकीपटू मुजीबुर रहमान याने सात गडी बाद केले. राजपूतने सात आणि अ‍ॅन्ड्रयू टायेने नऊ गडी बाद केले.
त्याचवेळी मुंबईने आतापर्यंत गटांगळ्या खात प्रवाद केला आहे. वेगवान गोलंदाज अत्यंत महागडे ठरले. सलामीवीर सूर्यकुमार यादव (२८३) याचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले आहेत. किएरॉन पोलार्ड अपेक्षित आक्रमक फटकेबाजी करु शकला नाही, तर हार्दिक पांड्याला खराब गोलंदाजीचा फटका सोसावा लागला. बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आणि मिशेल मॅक्लीनघन हेही महागडे ठरले. मुंबईसाठी जमेची एकमेव बाब म्हणजे नवा चेहरा मयंक मार्कंडेय याचा शोध. पदार्पणात त्याने ११ गडी बाद करुन आपली छाप पाडली आहे.

Web Title: Mumbai's 'Kar or Mara', a tough challenge for Kings XI Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.