चिंताजनक; मानेवर चेंडू आदळल्यामुळे श्रीलंकेचा फलंदाज स्ट्रेचरवर, काळजाचा ठोका चुकला...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेला मोठा धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 11:42 AM2019-02-02T11:42:46+5:302019-02-02T11:58:47+5:30

whatsapp join usJoin us
Karunaratne cops a bouncer from Cummins and has to be stretchered off after lengthy treatment on the field. | चिंताजनक; मानेवर चेंडू आदळल्यामुळे श्रीलंकेचा फलंदाज स्ट्रेचरवर, काळजाचा ठोका चुकला...

चिंताजनक; मानेवर चेंडू आदळल्यामुळे श्रीलंकेचा फलंदाज स्ट्रेचरवर, काळजाचा ठोका चुकला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 534 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे सलामीवीर दिमुथ करुणारत्ने व लाहिरू थिरीमाने यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावा जोडल्या, परंतु 32 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर थिरीमाने बाद झाला. तत्पूर्वी करुणारत्नेच्या डोक्यावर चेंडू आदळला आणि तो जमिनीवर आडवाच झाला. त्याच्या मदतीला वैदकीय अधिकारी धावले, परंतु हे प्रकरण गंभीर असल्याचे कळताच त्यांनी स्ट्रेचर मागवला. करुणारत्नेला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आल्याने श्रीलंकेसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचाही काळजाचा ठोका चुकला आहे. करुणारत्नेच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळाली नसल्याने सर्वांची चिंता अधिक वाढली आहे. 


मानेवर असह्य वेदना होत असल्याचे करुणारत्नेने डॉक्टरांना सांगितले. त्याला त्वरीत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. 



पाहा व्हिडीओ... 







 

Web Title: Karunaratne cops a bouncer from Cummins and has to be stretchered off after lengthy treatment on the field.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.