85 वर होता, 16 वर आला; बुमराहने वर्षभरात चमत्कारच केला!

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराने बॉक्सिंग डे कसोटी गाजवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 04:22 PM2018-12-31T16:22:41+5:302018-12-31T16:30:11+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah gain big in the latest ICC Test Player Rankings | 85 वर होता, 16 वर आला; बुमराहने वर्षभरात चमत्कारच केला!

85 वर होता, 16 वर आला; बुमराहने वर्षभरात चमत्कारच केला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआयसीसी क्रमवारीत जसप्रीत बुमराची उत्तुंग झेपमेलबर्न कसोटीनंतर 12 स्थानांनी सुधारणाऑस्ट्रेलियात एका सामन्यात नऊ विकेट घेणारा पहिला भारतीय

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराने बॉक्सिंग डे कसोटी गाजवली. पहिल्या डावात 33 धावांत 6 विकेट आणि दुसऱ्या डावात 3 विकेट घेत त्याने भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताने तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर 137 धावांनी विजय मिळवला. भारताने 41 वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला. बुमराला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. ऑस्ट्रेलियात एका कसोटीत नऊ विकेट्स घेणारा बुमरा हा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. या कामगिरीच्या जोरावर बुमराने आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान गाठले आहे. 

बुमरासाठी सरते वर्ष अविस्मरणीय ठरलं. मेलबर्न कसोटीत नऊ विकेट घेणाऱ्या बुमराला मॅन ऑफ दी मॅच घोषित करण्यात आले. 2008 नंतर ऑस्ट्रेलियात हा पुरस्कार पटकावणारा तो पहिलाच भारतीय जलदगती गोलंदाज ठरला आहे. 2008 मध्ये इरफान पठाणने हा पुरस्कार जिंकला होता. मेलबर्नवर 18 वर्षांनंतर भारतीय खेळाडूने मॅन ऑफ दी पुरस्कार जिंकला. 1999 मध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकरने मेलबर्नवर हा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर 18 वर्षांनी आज बुमराने हा पराक्रम केला. 



त्याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जलदगती गोलंदाजाचा मान पटकावत कपिल देव यांना मागे टाकले. कपिल देव यांनी 1985 साली एका कसोटीत 109 धावा देत 8 विकेट घेतल्या होत्या. पण बुमराने हा विक्रम मोडला आणि त्याने 86 धावा देत 9 बळी टिपले. मेलबर्नवर बीएस चंद्रशेखर यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी 1977 साली 104 धावांत 12 बळी ( 6/52 व 6/52)  टिपले होते. याचा त्याला आयसीसी क्रमवारीत फायदा झाला.

बुमराने जानेवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले. त्यावेळी त्याची क्रमवारी ही 85 होती आणि वर्षाअखेरीत त्याने गरूड भरारी घेतली आहे. आयसीसीने सोमवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत बुमरा 16 व्या क्रमांकावर आला आहे. मेलबर्न कसोटीतील कामगिरीनंतर त्याने 12 स्थानांनी झेप घेतली. 2018च्या सुरुवातीला 85 व्या स्थानावर असलेल्या बुमराने चमत्कारिक कामगिरी करताना 16वे स्थान गाठले. 2018 मध्ये त्याने 9 कसोटी सामन्यांत 48 विकेट घेतल्या आहेत. 



 बुमराबरोबर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट यांनीही आयसीसी क्रमवारीत उत्तुंग झेप घेतली आहे. 

Web Title: Jasprit Bumrah gain big in the latest ICC Test Player Rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.