IPL 2019 : चेन्नईविरुद्धच्या विजयाचे रोहितने दिले 'या' खेळाडूंना श्रेय

सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने संघातील काही खेळाडूंना विजयाचे श्रेय दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 11:31 PM2019-05-07T23:31:27+5:302019-05-07T23:34:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Rohit Sharma gave these players' credit to win against Chennai Super Kings | IPL 2019 : चेन्नईविरुद्धच्या विजयाचे रोहितने दिले 'या' खेळाडूंना श्रेय

IPL 2019 : चेन्नईविरुद्धच्या विजयाचे रोहितने दिले 'या' खेळाडूंना श्रेय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019 : पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सनेचेन्नई सुपर किंग्सवर सहज विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने संघातील काही खेळाडूंना विजयाचे श्रेय दिले आहे.



 

सामन्यानंतर रोहित म्हणाला की, " चेन्नईचा संघ हा चांगलाच समतोल आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सामना खेळताना विशेष रणनीती आखावी लागते. आम्हीदेखील या सामन्यात चेन्नईविरुद्ध विशेष रणनीती आखली होती. या सामन्यात रणनितीची योग्य अमंलबजावणी झाली आणि निकाल आमच्या बाजूने लागला."

रोहित पुढे म्हणाला की, " चेन्नईच्या पहिल्या तीन फलंदाजांना झटपट बाद करणे आमचे ध्येय होते. राहुल चहर, कृणाल पंड्या आणि जयंत यादव या तिन्ही फिरकीपटूंनी अचूक मारा केला. त्यांच्या भेदक माऱ्यामुळेच आम्ही चेन्नईच्या धावसंख्येला वेसण घालू शक़लो. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने नेत्रदीपक फलंदाजी केली आणि त्यामुळेच आम्ही सहजपणे अंतिम फेरीत पोहोचू शकलो."
मुंबई... मुंबई... चेन्नईवर मात करत फायमलमध्ये धडक
चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानात विजय मिळवत मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. या विजयासह मुंबईने फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुबंईपुढे 132 धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान लीलया पार केले.

चेन्नईच्या 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक हे झटपट बाद झाले. पण त्यानंतर सूर्यकुमार आणि इशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी रचली आणि मुंबईच्या विजयाचा पाया रचला.

धावगती कशी वाढवायची, याचे उत्तम उदाहरण महेंद्रसिंग धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर-1 सामन्यात दाखवून दिले. कारण एकेकाळी चेन्नई सुपर किंग्स शंभर धावांचा टप्पा ओलांडणार की नाही, असे चाहत्यांना वाटत होते. पण धोनीने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत संघाला 131 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. आता धोनी आपल्या चाणाक्ष नेतृत्वाच्या जोरावर चेन्नईला सामना जिंकवून देणार का, याची चर्चा रंगत आहे. धोनीने या सामन्यात 29 चेंडूंत 37 धावा केल्या. त्याला यावेळी अंबाती रायुडूची चांगला साथ मिळाली. रायुडूने या सामन्यात 29 चेंडूंत 37 धावा केल्या.

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण चेन्नईच्या संघाची चांगली सुरुवात झाली नाही. चेन्नईने आपले पहिले तीन फलंदाज फक्त 32 धावांमध्ये गमावले. पण त्यानंतर अंबाती रायुडू आणि मुरली विजय यांनी संघाला स्थैर्य मिळवून दिले. विजय यावेळी 26 धावा करून बाद झाला. पण त्यानंतर रायुडू आणि महेंद्रसिंग धोनी यांनी संघाची धावगती चांगलीच वाढवली.

धोनी आऊट होता, पण शेवटपर्यंत नॉट आऊट राहिला...
एखादा खेळाडू आऊट झाला आणि तरीही तो डाव संपेपर्यंत खेळत राहीला, असे तुम्हाला पाहायला मिळाले नसेल. पण मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात अशी एक गोष्ट झाल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जसप्रीत बुमराच्या अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आऊट होता. पण त्यानंतर तो डाव पूर्ण होइपर्यंत खेळत राहिल्याचे पाहायला मिळाले.

धोनी जेव्हा खेळायला आला तेव्हा चेन्नईची फारशी चांगली स्थिती नव्हती. धोनीने आल्यापासून मुंबईच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ले चढवले आणि चेन्नईला 131 धावा करून देण्यात मोठा वाटा उचलला. पण या सामन्यात धोनीला दैवानेही चांगलीच साथ दिल्याचे पाहायला मिळाले.

सलिथ मलिंगाच्या 19व्या षटकात धोनीने दोन दमदार षटकार लगावले. अखेरच्या षटकातही धोनी फटक्यांची अतिषबाजी करेल, असे वाटत होते. पण बुमराच्या 20व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीचा झेल पकडला गेला. या चेंडूवर धोनी मोठा फटका मारायला गेला आणि त्याची बॅट हातातून निसटली. पण त्यावेळी धोनीचा झेल पकडला गेला होता. धोनी बाद झाल्याने मुंबईच्या खेळाडूंनी सुस्कारा सोडला. पण सामन्यात चांगलाच ट्विस्ट आला. धोनीबाद झाल्यावर मैदानावरील पंचांनी चेंडू योग्य आहे की नाही, याची तपासणी केली. त्यावेळी हा चेंडू नो-बॉल असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे धोनी नॉट आऊट ठरला आणि अखेरपर्यंत खेळत राहिला.

Web Title: IPL 2019: Rohit Sharma gave these players' credit to win against Chennai Super Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.