IPL 2019 : केकेआरची धडाकेबाज फलंदाजी, मुंबईपुढे 233धावांचे आव्हान

रसेलच्या ४० चेंडूंत नाबाद ८० धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 09:45 PM2019-04-28T21:45:36+5:302019-04-28T21:47:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Kolkata Knight Riders given 233 runs target to Mumbai Indians | IPL 2019 : केकेआरची धडाकेबाज फलंदाजी, मुंबईपुढे 233धावांचे आव्हान

IPL 2019 : केकेआरची धडाकेबाज फलंदाजी, मुंबईपुढे 233धावांचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल २०१९ : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांनी धमाकेदार फलंदाजी केली. मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाला केकेआरच्या फलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडले. रसेलच्या ४० चेंडूंत नाबाद ८० धावांच्या जोरावर कोलकाताला मुंबईपुढे २३३ धावांचे आव्हान ठेवता आले. रसेलने आपल्या खेळीत सहा चौकार आणि आठ षटकार लगावले.



 

मुंबईने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या गोष्टीचा चांगलाच फायदा केकेआरने उचलला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्यांनी मुंबईच्या गोलंदाजीवर हल्ला करायला सुरुवात केली. ख्रिस लिन आणि शुभमन गिल या दोघांनीही अर्धशतके लगावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. लिन आणि गिल या दोघांनी संघासाठी ९६ धावांची सलामी दिली. लिनने २९ चेंडूंत ५४ धावांची खेळी साकारली. लिन बाद झाल्यावर गिलने गोलंदाजांचा समाचार घेणे सुरुच ठेवले. गिलने ४५ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७६ धावा काढल्या. त्यानंतर आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांनीही मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.

Web Title: IPL 2019: Kolkata Knight Riders given 233 runs target to Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.