IPL 2019: जसप्रीत बुमरा फिट, तरीही सामन्याला मुकणार?

जसप्रीत बुमरा याला विश्रांती देण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 05:48 PM2019-03-28T17:48:57+5:302019-03-28T17:51:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Jaspreet Bumara fit, but still lose the match | IPL 2019: जसप्रीत बुमरा फिट, तरीही सामन्याला मुकणार?

IPL 2019: जसप्रीत बुमरा फिट, तरीही सामन्याला मुकणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरु, आयपीएल 2019 : दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराला दुखापत झाली होती. त्यामुळे बुमरा उर्वरीत सामने खेळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण आता बुमरा फिट झाल्याचे मुंबई इंडियन्स म्हणत असली तरी त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात खेळवण्यात येणार नाही, अशी माहिती मिळत आहे.

बुमरा फिट असला तरी त्याला खबरदारीचा उपाय म्हणून बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात खेळण्यात येणार नाही, असे समजते आहे. बुमराच्या जागी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला संघात स्थान देण्यात येऊ शकते. 

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांनी पुरेशी विश्रांती मिळायला हवी, अशी इच्छा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली होती. त्याची ही इच्छा पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यानुसार भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमरा याला विश्रांती देण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करत आहे.

बंगळुरुवर मुंबई इंडियन्सच भारी, जाणून घ्या...
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये आज आयपीएलच्या बाराव्या हंगामातला पहिला सामना रंगणार आहे. पण आतापर्यंत झालेल्या या दोन्ही संघांच्या सामन्यांमध्ये नेमकं भारी कोण पडलंय, हे तुम्हाला माहिती आहे का...

आतापर्यंत मुंबई आणि बंगळुरु यांच्यामध्ये एकूण 23 सामने झाले आहेत. या 23 सामन्यांपैकी मुंबईने 14 सामने जिंकले आहेत, तर बंगळुरुने नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. बंगळुरुमध्ये या दोन्ही संघांमध्ये 9 सामने झाले आहेत. या नऊ सामन्यांपैकी तब्बल सामने मुंबईने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये बंगळुरुला विजय मिळवता आला आहे.

या हंगामात दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्याच लढतीत चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने बंगळुरुचे पानीपत केले होते. या सामन्यात बंगळुरुच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. चेन्नईने बंगळुरुवर पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता.

मुंबईलादेखील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पराभव एवढा दारुण होता की, त्यांना गुणतालिकेत अखेरचे स्थान मिळाले आहे. दिल्लीच्या संघाने मुंबईविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 213 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना युवराज सिंगने दमदार अर्धशतक झळकावले होते. पण युवराजला मुंबईला विजय मिळवून देता आला नव्हता. त्यामुळे बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा संघ पहिला विजय मिळवणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

Web Title: IPL 2019: Jaspreet Bumara fit, but still lose the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.