IPL 2019 : सचिन तेंडुलकर म्हणतो, मुंबई इंडियन्समध्ये मला निर्णय घेण्याचा अधिकार नाही

सचिन आपल्या उत्तरामध्ये काय म्हणाला ते वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 06:19 PM2019-04-28T18:19:42+5:302019-04-28T18:21:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: I do not have the right to make decisions in Mumbai Indians, Sachin Tendulkar answered | IPL 2019 : सचिन तेंडुलकर म्हणतो, मुंबई इंडियन्समध्ये मला निर्णय घेण्याचा अधिकार नाही

IPL 2019 : सचिन तेंडुलकर म्हणतो, मुंबई इंडियन्समध्ये मला निर्णय घेण्याचा अधिकार नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल २०१९ : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाबीसीसीआयने आयुक्त केलेल्या लोकपाल यांनी नोटीस पाठवली होती. या नोटीसीमध्ये सचिन हा मुंबई इंडियन्सच्या संघाचा एक भाग आहे आणि त्यामुळे परस्पर हितसंबंध जपले जात आहेत. या नोटीशीला उत्तर देताना मुंबई इंडियन्समध्ये मला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे सचिनने म्हटले आहे.

Happy Birthday Sachin Tendulkar: ... When Sachin Tendulkar played for Pakistan | Happy Birthday Sachin Tendulkar: ...जेव्हा सचिन तेंडुलकर पाकिस्तानकडून खेळला होता

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे (एमपीसीए) सदस्य संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयकडे सचिन आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याबाबत तक्रार केली होती. यामध्ये त्यांनी सचिन आणि लक्ष्मण बीसीसीआयच्या सल्लागार समितीमध्ये आहेत, त्याचबरोबर ते आयपीएलच्या संघाचाही एक भाग आहेत. त्यामुळे परस्पर हितसंबंध जपले जात असल्याची भूमिका गुप्ता यांनी मांडली होती. त्यानुसार बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी सचिनला नोटीस पाठवली होती. या नोटीशीला सचिनने आज उत्तर पाठवले आहे.

आपल्या उत्तरामध्ये सचिनने म्हटले आहे की, " आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या संघाकडून मला कोणताही लाभ मिळत नाही. त्याचबरोबर संघाच्या निवड प्रक्रियेमध्ये माझा सहभाग नसतो. त्यामुळे यामध्ये परस्पर हितसंबंध जपला जात नाही."

नोटिस पाठवून लोकपालांनी दिले सचिनला ‘बर्थ डे गिफ्ट’
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सल्लागार समितीचे सदस्य असताना आयपीएलमध्ये फ्रेंचायझी टीमचे मेंटर म्हणून कामकाज पाहत असलेल्या सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंना बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी परस्पर हितसंबंधप्रकरणी नोटिस पाठविली आहे. विशेष म्हणजे सचिनला त्याच्या ४६व्या वाढदिवसाच्या दिवशीच बीसीसीआयच्या लोकपालांनी ही नोटिस पाठविली.

जैन यांनी सचिन व लक्ष्मण यांच्याकडून २८ एप्रिलपर्यंत लेखी स्पष्टीकरण मागितले असून बीसीसीआयकडूनही स्पष्टीकरण मागवले आहे. याप्रकरणी मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे (एमपीसीए) सदस्य संजीव गुप्ता यांनी तक्रार दिली आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, सचिन व लक्ष्मण यांनी दिलेल्या मुदतीमध्ये आपली बाजू मांडली नाही, तर त्यांना त्यानंतर दुसरी संधी दिली जाणार नाही, असेही लोकपालांनी स्पष्ट केले.

IPL 2019 sachin Tendulkar praises delhi capitals and rishabh pants performance | IPL 2019: तेंडुलकरनं केलं गांगुलीच्या खेळाडूंचे कौतुक; पंतच्या खेळीबद्दल म्हणाला.... 

सचिन मुंबई इंडियन्सचा, तर लक्ष्मण सनरायझर्स हैदराबादचा मेंटर आहे. विशेष म्हणजे परस्पर हितसंबंध जपल्याबद्दलचे यंदाचे हे तिसरे प्रकरण समोर आले आहे. याआधी माजी कर्णधार सौरव गांगुलीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तो बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष, सीएसी सदस्य आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार अशा तीन भूमिकेत होता. यासाठी गांगुलीला निवृत्त न्यायाधिश जैन यांच्यापुढे सनावणीसाठी उपस्थित रहावे लागले होते.

Web Title: IPL 2019: I do not have the right to make decisions in Mumbai Indians, Sachin Tendulkar answered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.