IPL 2019 : 'मांकड रनआऊट' हे नाव कसं पडलं, तुम्हाला माहिती आहे का...

... त्यावेळी सर डॉन ब्रॅडमन यांनी घेतली होती भारताची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 06:04 PM2019-03-26T18:04:35+5:302019-03-26T18:06:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: How was the name 'Mankad Run Out', do you know... | IPL 2019 : 'मांकड रनआऊट' हे नाव कसं पडलं, तुम्हाला माहिती आहे का...

IPL 2019 : 'मांकड रनआऊट' हे नाव कसं पडलं, तुम्हाला माहिती आहे का...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जयपूर, आयपीएल 2019 : गेल्या काही तासांमध्येच  'मांकड रनआऊट' हा शब्द चांगलाच वायरल झाला आहे. सोमवारी झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 'मांकड' नियमामुळे चांगलाच गाजत आहे. पंजाबचा कर्णधार आर अश्विन याने राजस्थानच्या जोस बटलरला मांकड नियमानुसार धावबाद केले. पण, त्यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला. पण  'मांकड रन आऊट' हे नाव कसं पडलं, ते तुम्हाला माहिती आहे का...

भारताचे माजी कर्णधार विनू मांकड यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. भारतीय संघ १९४७ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी मांकड हे गोलंदाजी करत होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे बिल ब्राऊन फलंदाजीच्या दुसऱ्या टोकाला होते. मांकड हे गोलंदाजी करत असताना ब्राऊन हे क्रीझ सोडून पुढे गेले होते. त्यावेळी मांकड यांनी ब्राऊन यांना रनआऊट केले होते.

सर डॉन ब्रॅडमन यांनी घेतली होती भारताची बाजू
ब्राऊन यांना रनआऊट केल्यावर मांकड यांच्यावर टीका व्हायला सुरु झाली होती. पण यावेळी मांकड यांची बाजू सांभाळून घेतली ती ऑस्ट्रेलियाचे कर्णधार सर डॉन ब्रॅडमन यांनी. ब्रॅडमन यावेळी म्हणाले की, " जोपर्यंत चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत फलंदाज हा क्रीझमध्येच असायला हवा. त्यामुळे जे काही मांकड यांनी केले आहे ते चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही. "

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर. अश्विन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता तर आयपीएलचे चेअरमन राजीन शुक्ला यांनीदेखील अश्विन चुकीचा वागला असे मान्य केले आहे. त्यामुळे आता अश्विनवर आयपीएलचे गर्व्हनिंग कौन्सिल काय कारवाई करते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

शुक्ला याबाबत म्हणाले की, " आयपीएल सुरु होण्यापूर्वी कोलकाता येथे कर्णधार, पंच आणि सामनाधिकारी यांनी एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये 'मांकड' नियमानुसार कोणत्याही फलंदाजाला आऊट करू नये, कारण ते शिष्टाचाराला धरून होत नाबी, असे सांगण्यात आले होते. या बैठकीला विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीही उपस्थित होते. "

Web Title: IPL 2019: How was the name 'Mankad Run Out', do you know...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.