IPL 2019 CSK vs KXIP : चेन्नई विजयपथावर परतली, पंजाबचा पराभव

चेन्नई,  आयपीएल 2019  : 2 बाद 7 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या मदतीला लोकेश राहुल व सर्फराज ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 03:25 PM2019-04-06T15:25:39+5:302019-04-06T20:13:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 CSK vs KXIP : चेन्नई विजयपथावर परतली, पंजाबचा पराभव | IPL 2019 CSK vs KXIP : चेन्नई विजयपथावर परतली, पंजाबचा पराभव

IPL 2019 CSK vs KXIP : चेन्नई विजयपथावर परतली, पंजाबचा पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019 : 2 बाद 7 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या मदतीला लोकेश राहुल व सर्फराज खान ही जोडी धावली. या दोघांनी शतकी भागीदारी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. पण, महेंद्रसिंग धोनीच्याकल्पक नेतृत्वासमोर पंजाबला हार मानावी लागली. धोनीने त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करताना पंजाबच्या धावगतीवर चाप बसवला आणि राहुल-सर्फराजवर दडपण निर्माण केले. त्याच जोरावर चेन्नईने हा सामना 22 धावांनी जिंकला. 160 धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला 5 बाद 138 धावांवरच समाधान मानावे लागले.

07:46 PM



 

07:20 PM

पण, या दोघांना चेन्नईच्या गोलंदाजांनी मोठे फटके मारण्यापासून रोखले. त्यामुळे चेंडू व धावांचे अतंर वाढले. त्याच दडपणात राहुल विकेट देऊन बसला. त्याने 47 चेंडूंत 55 धावा केल्या. त्यात 1 षटकार व तीन चौकार होते. 

07:14 PM

सर्फराज आणि राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. सर्फराजने 43 चेंडूंत 51 धावा केल्या, तर राहुलने 42 चेंडूंत 51 धावा केल्या.

07:11 PM

2 बाद 7 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या मदतीला लोकेश राहुल व सर्फराज खान ही जोडी धावली. या दोघांनी शतकी भागीदारी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. यावेळी लोकेश राहुलला नशिबाची साथही मिळाली. 

07:00 PM

13 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुलला अपयश आले. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्यासाठी राहुल पुढे गेला, परंतु धोनीने चपळाईने चेंडूकडे धाव घेतली. त्याने नेहमीच्या शैलीत चेंडू मागे न वळताच चेंडू थेट यष्टिंवर मारला. पण, बेल्स न पडल्याने राहुल बाद ठरला नाही. नशीबाचे पारडे राहुलच्या बाजूने झुकले होते. 

06:48 PM

सर्फराज आणि राहुल यांच्या संयमी खेळीने पंजाबने 10 षटकांत 2 बाद 71 धावा केल्या. त्यात राहुलच्या 36, तर सर्फराजच्या 29 धावा होत्या. 

06:40 PM

राहुल व सर्फराज या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि पंजाबला मजबूत स्थिती मिळवून दिली. 

06:24 PM

त्यानंतर लोकेश राहुल व सर्फराज खान यांनी सावध खेळ केला. पंजाबने पाच षटकांत 2 बाद 35 धावा केल्या. 
 

06:12 PM

पंजाबला अवघ्या 7 धावांवर 2 झटके बसले. ख्रिस गेल व लोकेश राहुल समोर असतानाही चेन्नईचा कर्णधार धोनीनं दुसरे षटक हरभजन सिंगला टाकण्यासाठी बोलावले. भज्जीनं हा निर्णय सार्थ ठरवताना गेल व मयांक अग्रवालला बाद केले. 

06:08 PM



 

05:49 PM



 

05:14 PM



 

05:13 PM

अश्विनने 4 षटकांत 23 धावा देत 3 विकेट घेतल्या. 

05:08 PM

पुढच्याच चेंडूवर सुरेश रैनालाही अश्विनने त्रिफळाचीत केले. रैनाने 20 चेंडूंत 17 धावा केल्या. 

05:06 PM

अश्विनने त्याला माघारी पाठवले. ड्यू प्लेसिस 38 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकार खेचून 54 धावा करत माघारी परतला.

05:01 PM



 

05:01 PM

ड्यू प्लेसिसने 33 चेंडूंत 50 धावा केल्या, त्यात 2 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. 

04:53 PM

पहिल्या सहा षटकांत 54 धावा करणाऱ्या चेन्नईला पुढील 4 षटकांत केवळ 18 धावाच करण्यात यश आले. 



 

04:50 PM

 वॉटसन बाद झाल्यानंतर चेन्नईची धावगती मंदावली. त्यांना 10 षटकांत 1 बाद 71 धावाच करता आल्या. 
 

04:39 PM

आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आर अश्विनने चेन्नईचा सलामीवीर वॉटसनला माघारी पाठवले. वॉटसनने 24 चेंडूंत 26 धावा केल्या आणि त्यात 3 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. 
 

04:30 PM

वॉटसन आणि ड्यू प्लेसिस यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 6 षटकांत बिनबाद 54 धावा केल्या. 

04:28 PM

सॅम कुरनच्या उजव्या खांद्यावर दुखापत, शेन वॉटसनने मारलेला चेंडू झेल करण्याच्या प्रयत्नात दुखापत...

04:24 PM

अँड्य्रू टायच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंत शेन वॉटसनने 11 धावा चोपल्या. त्यात ड्यू प्लेसिसनेही 7 धावा काढल्या. चेन्नईने पाच षटकांत 47 धावा केल्या. 

04:14 PM

शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी सावध सुरुवात करताना चेन्नईची धावगती हळुहळू वाढवली. 

04:01 PM



 

03:54 PM



 

03:47 PM



 

03:46 PM

महेंद्रसिंग धोनी आज चेन्नई सुपर किंग्सकडून 150 वा सामना खेळणार आहे. सुरेश रैनानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. 

03:42 PM

चेन्नई सुपर किंग्स - शेन वॉटसन, फॅफ ड्यू प्लेसिस, अंबाती रायुडू, सुरेश रैना, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, स्टॉट कुगेलेजन, दीपक चहर, हरभजन सिंग, इम्रान ताहीर

03:40 PM

किंग्स इलेव्हन पंजाब - आर अश्विन, लोकेश राहुल, ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, सर्फराज खान, डेव्हिड मिलर, मनदीप सिंग, सॅम कुरन, अँड्य्रू टाय, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी

03:38 PM

अश्विनची चाहत्यांना भावनिक साद - हा सामना माझ्यासाठी भावनिक आहे. घरच्या चाहत्यांना माझ्या पाठीशी उभं राहावं आणि मी खात्री देतो की त्यांना निराश करणार नाही. 



 

03:36 PM

चेन्नईच्या संघात तीन बदल - शार्दूल ठाकूर, मोहित शर्मा आणि ड्वेन ब्राव्हो यांना विश्रांती. स्कॉट कुगेलजन, हरभजन सिंग व फॅफ ड्यू पेलिस यांना संधी



 

Web Title: IPL 2019 CSK vs KXIP : चेन्नई विजयपथावर परतली, पंजाबचा पराभव

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.