IPL 2019 CSK vs KXIP : महेंद्रसिंग धोनीनं चेन्नईची लाज राखली, पंजाबसमोर 161 धावांचे लक्ष्य

IPL 2019 CSK vs KXIP : धोनीने 23 चेंडूंत 37 धावा केल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 05:34 PM2019-04-06T17:34:17+5:302019-04-06T17:47:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 CSK vs KXIP: Chennai Super Kings set 161 target on Kings XI Punjab | IPL 2019 CSK vs KXIP : महेंद्रसिंग धोनीनं चेन्नईची लाज राखली, पंजाबसमोर 161 धावांचे लक्ष्य

IPL 2019 CSK vs KXIP : महेंद्रसिंग धोनीनं चेन्नईची लाज राखली, पंजाबसमोर 161 धावांचे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019 : किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर चेन्नई सुपर किंग्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबचा कर्णधार आर अश्विनने दिलेल्या तीन धक्क्यातून सावरण्याची संधीच चेन्नईला मिळाली नाही. पण, महेंद्रसिंग धोनीनं अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजी मुळे चेन्नईला निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 160 धावा करता आल्या.  धोनीने 23 चेंडूंत 37 धावा केल्या, तर रायुडूने 15 चेंडूंत 21 धावा केल्या. या जोडीनं अर्धशतकी भागीदारी केली. 



शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी सावध सुरुवात करताना चेन्नईची धावगती हळुहळू वाढवली. अँड्य्रू टायच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंत वॉटसनने 11 धावा चोपल्या. त्यात ड्यू प्लेसिसनेही 7 धावा काढल्या. चेन्नईने पाच षटकांत 47 धावा केल्या. या दोघांनी 5.3 षटकांत अर्धशतकी भागीदारी केली. सहाव्या षटकात सॅम कुरनच्या उजव्या खांद्यावर दुखापत झाली. वॉटसनने मारलेला चेंडू झेल करण्याच्या प्रयत्नात ही दुखापत झाली. 

वॉटसन आणि ड्यू प्लेसिस यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 6 षटकांत बिनबाद 54 धावा केल्या. आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आर अश्विनने चेन्नईचा सलामीवीर वॉटसनला माघारी पाठवले. वॉटसनने 24 चेंडूंत 26 धावा केल्या आणि त्यात 3 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. वॉटसन बाद झाल्यानंतर चेन्नईची धावगती मंदावली. त्यांना 10 षटकांत 1 बाद 71 धावाच करता आल्या. पहिल्या सहा षटकांत 54 धावा करणाऱ्या चेन्नईला पुढील 4 षटकांत केवळ 18 धावाच करण्यात यश आले. ड्यू प्लेसिसने 33 चेंडूंत 50 धावा केल्या, त्यात 2 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. ड्यू प्लेसिसचे आयपीएलमधील हे दहावे अर्धशतक ठरले. पण, अश्विनने त्याला माघारी पाठवले. ड्यू प्लेसिस 38 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकार खेचून 54 धावा करत माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर सुरेश रैनालाही अश्विनने त्रिफळाचीत केले. रैनाने 20 चेंडूंत 17 धावा केल्या. अश्विनने 4 षटकांत 23 धावा देत 3 विकेट घेतल्या. 



चेन्नईने 15 षटकांत 3 बाद 108 धावा केल्या. पंजाबच्या गोलंदाजांची टिच्चून मारा करताना चेन्नईच्या धावांवर चाप बसवला. महेंद्रसिंग धोनी व अंबाती रायुडू यांना मोठे फटके मारण्याची संधी त्यांनी दिली नाही. 14 चेंडूंनंतर धोनीला पहिला चौकार मारण्यात यश आले. त्यानंतर धोनीला सूर गवसला. त्याने फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.  अंबाती रायुडूही त्याला तोडीस तोड साथ दिली. 

Web Title: IPL 2019 CSK vs KXIP: Chennai Super Kings set 161 target on Kings XI Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.