IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नर आयपीएलमधूनही बाहेर; बीसीसीआयने घेतला निर्णय

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 03:39 PM2018-03-28T15:39:39+5:302018-03-28T15:39:39+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018: Smith and Warner out of IPL; Decision taken by BCCI | IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नर आयपीएलमधूनही बाहेर; बीसीसीआयने घेतला निर्णय

IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नर आयपीएलमधूनही बाहेर; बीसीसीआयने घेतला निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड करणे, हे स्टीव्हन स्मिथ  आणि डेव्हिड वॉर्नर यांना चांगलेच महागात पडले आहेत. आयसीसी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर बीसीसीआयनेही कडक कारवाई केली आहे. या दोघांना यंदाच्या आयपीएलमध्ये खेळता येणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर हे काळे कृत्य करणाऱ्या कॅमेरुन बेनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालती आहे. यापूर्वी आयसीसीने स्मिथवर एका कसोटी सामन्याची बंदी घातली आहे. त्याचबरोबर त्याच्या मानधनातील 100 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे. आयसीसीने बेनक्रॉफ्टला तीन डिमेरिट गुण दिले आहेत. त्याचबरोबर त्याच्या मानधनातील 75 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे. 

काय आहे प्रकरण
केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. पंच जवळ येत असतानाच बेनक्राफ्ट याने आपल्या अंतवस्त्रात एक छोटी पिवळी वस्तु लपवली. जेव्हा पंचांनी त्याला विचारले. तेव्हा पँटमध्ये हात टाकून त्याने ती वस्तु दाखवली. चष्मा साफ करण्याच्या मऊ कपड्यासारखी ती होती. बेनक्राफ्ट याने पत्रकार परिषदेत मान्य केले की तो टेपने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना आपले पद गमवावे लागले होते.

Web Title: IPL 2018: Smith and Warner out of IPL; Decision taken by BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.