IPL 2018 : आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले... काय ते जाणून घ्या

इडन गार्डन्सवर बुधवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आयपीएलचा सामना झाला. या सामन्यात मुंबईने कोलकात्यावर 102 धावांनी मोठा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 06:59 PM2018-05-10T18:59:35+5:302018-05-10T18:59:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018: This is the first time in the IPL history ... | IPL 2018 : आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले... काय ते जाणून घ्या

IPL 2018 : आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले... काय ते जाणून घ्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआतापर्यंतच्या 22 सामन्यांमध्ये मुंबईने कोलकात्यावर 18 वेळा विजय मिळवला आहे. कोलकात्याला 2015 सालानंतर एकदाही मुंबईवर विजय मिळवता आलेला नाही. ही गोष्ट आयपीएलमध्ये यापूर्वी कधीही घडलेली नाही.

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये बरेच विक्रम घडत असतात. पण काही गोष्टी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाही घडतात. अशीच एक गोष्ट आयपीएलच्या इतिहासात बुधवारी पहिल्यांदाच घडली. काय आहे ही गोष्ट ते जाणून घ्या.

इडन गार्डन्सवर बुधवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आयपीएलचा सामना झाला. या सामन्यात मुंबईने कोलकात्यावर 102 धावांनी मोठा विजय मिळवला. आतापर्यंतच्या 22 सामन्यांमध्ये मुंबईने कोलकात्यावर 18 वेळा विजय मिळवला आहे. कोलकात्याला 2015 सालानंतर एकदाही मुंबईवर विजय मिळवता आलेला नाही. ही गोष्ट आयपीएलमध्ये यापूर्वी कधीही घडलेली नाही.

कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात इशान किशनच्या 62 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 210 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव 102 धावांत संपुष्टात आला होता. हा मुंबईने केलेला कोलकात्याचा सर्वात मोठा पराभव आहे. आतापर्यंतचे कोलकात्याचे केलेले काही मोठे पराभव पाहा.


धावांचे अंतर    प्रतिस्पर्धी    मैदान               वर्ष
102 धावा            मुंबई        इडन गार्डन्स        2018     

92 धावा              मुंबई      पोर्ट एलिजाबेथ     2009 

65 धावा              मुंबई        वानखेड़े             2013

55 धावा             चेन्नई       इडन गार्डन्स     2010   

55 धावा             दिल्ली   फिरोजशाह कोटला  2018       

Web Title: IPL 2018: This is the first time in the IPL history ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.