भारतीय युवा संघाचा जयजयकार....

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा एक डाव आणि 117 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 असे निर्विवाद वर्चस्व राखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 08:12 PM2018-07-27T20:12:37+5:302018-07-27T20:13:11+5:30

whatsapp join usJoin us
Indian youth team won .... | भारतीय युवा संघाचा जयजयकार....

भारतीय युवा संघाचा जयजयकार....

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताने श्रीलंकेवर फॉलोऑन लादला. त्यानंतर श्रीलंकेचा दुसरा डाव 150 धावांत आटोपत भारताने दमदार विजय मिळवला. 

कोलंबो : भारताच्या युवा (19-वर्षांखालील) भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा एक डाव आणि 117 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 असे निर्विवाद वर्चस्व राखले.

भारताने पहिल्या डावात पवन शहाच्या दमदार द्विशतकी खेळीच्या जोरावर 613 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर भारताने श्रीलंकेवर फॉलोऑन लादला. त्यानंतर श्रीलंकेचा दुसरा डाव 150 धावांत आटोपत भारताने दमदार विजय मिळवला. 


Web Title: Indian youth team won ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.