आयसीसी चॅम्पियनशीपसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ श्रीलंकेचा दौरा करणार

भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या सत्रातील लढतीसाठी ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान श्रीलंकेचा दौरा करणार आहे, अशी माहिती आयसीसीने सोमवारी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 12:28 AM2018-09-11T00:28:28+5:302018-09-11T06:44:09+5:30

whatsapp join usJoin us
The Indian women's cricket team will be touring Sri Lanka for the ICC championship | आयसीसी चॅम्पियनशीपसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ श्रीलंकेचा दौरा करणार

आयसीसी चॅम्पियनशीपसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ श्रीलंकेचा दौरा करणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या सत्रातील लढतीसाठी ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान श्रीलंकेचा दौरा करणार आहे, अशी माहिती आयसीसीने सोमवारी दिली.

आयसीसी महिला विश्वचषक २०२१ साठी पात्र ठरण्याच्या शर्यतीतील तळातील चार संघ श्रीलंका, भारत, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेची नजर ही टॉप चार स्थानांवर असणाºया आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांच्या जवळ पोहोचण्याकडे असेल. आयसीसी महिला विश्वचषक २०१७ च्या फायनलमध्ये धडक मारणारा भारतीय संघ सहा सामन्यांतील चार गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. भारतीय संघाने दोन विजय हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-१ विजयादरम्यान नोंदवले. श्रीलंकेचा संघ पाकिस्तान आणि वेस्टइंडीजविरुद्ध मालिका खेळल्यानंतर एकही गुण मिळवू शकला नाही.

श्रीलंकेत ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान होणारी मालिका ही दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. घरच्या मैदानावर आॅस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताजवळ पुनरागमन करण्याची संधी असेल, तर श्रीलंकेचा संघ खाते उघडण्याच्या इराद्याने खेळेल. स्पर्धेच्या आधीच्या सत्रात भारताविरुद्ध ०-३ असा पराभव हा संघ विसरून श्रीलंकेचा संघ खेळण्याचा प्रयत्न करील.
भारताची कर्णधार मिताली राज म्हणाली, ‘आम्ही निश्चितच आपल्या क्षमतेनुसार खेळू, ज्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून जास्तीत जास्त गुण मिळवता येऊ शकतील.’

>भारतीय संघ
मिताली राज (कर्णधार), तान्या भाटिया, एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, डी. हेमलता, मानसी जोशी, हरमनप्रीत कौर, वेदा कृ ष्णमूर्ती, स्मृती मानधना, शिखा पांडे, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा आणि पूनम यादव.
>भारत विरुद्ध श्रीलंका लढतीचे वेळापत्रक
११ सप्टेंबर : पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना, गॅले.
१३ सप्टेंबर : दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना, गॅले.
१६ सप्टेंबर : तिसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना, कतुनायके.

Web Title: The Indian women's cricket team will be touring Sri Lanka for the ICC championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ICCआयसीसी