भारतीय अंध क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका जिंकली

भारतीय संघाचा कर्णधार अजय रेड्डीने सकाळी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत इंग्लंडच्या संघाला १३९धावांमध्ये बाद केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 08:49 PM2018-10-04T20:49:25+5:302018-10-04T20:50:23+5:30

whatsapp join usJoin us
Indian blind cricket team won the bilateral Twenty20 series against England | भारतीय अंध क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका जिंकली

भारतीय अंध क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका जिंकली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताता कर्णधार अजयने फक्त ६ धाव देऊन ४ गडी बाद केले.

बेंगळुरू: अंधाच्या झालेल्या ट्वेन्टी-२० स्पर्धेत भारतानेइंग्लंडवर २-० असा विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे या स्पर्धेचा एक सामना होऊ शकला नाही.
भारताचा कर्णधार अजय रेड्डीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार अजयने फक्त सहा धावांमध्ये इंग्लंडच्या चार फलंदाजांना बाद केले. अजयच्या या भेदक माऱ्यामुळे भारताला इंग्लंडला १३९ धावांत तंबूत पाठवता आले. पावसामुळे या सामन्यात भारताची फलंदाजी होऊ शकली नाही. पण यापूर्वी भारताने दोन्ही सामने जिंकले होते. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला असला तरी भारताने ही मालिका २-० अशी जिंकली आहे.

उद्यापासून भारत, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये तिरंगी मालिका रंगणार आहे. या मालिकेत उद्या भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होणार आहे.

Web Title: Indian blind cricket team won the bilateral Twenty20 series against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.