India vs West Indies : वेस्ट इंडीज 35 वर्षांचा मालिका विजयाचा दुष्काळ संपवणार का?

India vs West Indies: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला 4 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. यजमान भारतीय संघ या मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 12:10 PM2018-10-02T12:10:18+5:302018-10-02T12:11:02+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies: can west indies ended 35 years series won drot? | India vs West Indies : वेस्ट इंडीज 35 वर्षांचा मालिका विजयाचा दुष्काळ संपवणार का?

India vs West Indies : वेस्ट इंडीज 35 वर्षांचा मालिका विजयाचा दुष्काळ संपवणार का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आत्तापर्यंत 22 कसोटी मालिका झाल्या आहेत. वेस्ट इंडीजने 12, तर भारताने 8 मालिका जिंकल्या आहेत. 2 मालिका अनिर्णीत राहिल्या.

राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडीज : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला 4 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. यजमान भारतीय संघ या मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. इंग्लंडविरुद्ध झालेला मानहानिकारक पराभव विसरून नव्या दमाने विराट सेना वेस्ट इंडीजचा सामना करणार आहे. मात्र, 35 वर्षांचा मालिका विजयाचा दुष्काळ संपवण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघही संपूर्ण तयारीनिशी 

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आत्तापर्यंत 22 कसोटी मालिका झाल्या आहेत. 1948 मध्ये उभय देशांत पहिल्यांदा कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. त्यानंतर आत्तापर्यंत वेस्ट इंडीजने 12, तर भारताने 8 मालिका जिंकल्या आहेत. 2 मालिका अनिर्णीत राहिल्या. गुरुवारपासून दोन्ही देशांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. 2013 मध्ये हे दोन संघ समोरासमोर आले होते. त्यातही दोन सामने खेळवण्यात आले होते आणि सचिन तेंडुलकरची अखेरची कसोटी असल्याने ती मालिका आठवणीत राहिली आहे.

भारतीय भूमित वेस्ट इंडीजने अखेरचा कसोटी मालिका विजय 1983 मध्ये मिळवला होता. 1983 मध्येच भारताने वेस्ट इंडीजला नमवून प्रथमच वन डे विश्वचषक जिंकला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याच्या निर्धाराने कर्णधार क्लाईव्ह लॉइड संघासोबत भारतात दाखल झाले होते. सहा सामन्यांची ती मालिका वेस्ट इंडीजने 3-0 अशी जिंकली होती.  त्यानंतर 1987 व 1994 साली भारतात खेळलेल्या दोन सामन्यांची कसोटी मालिका वेस्ट इंडीजने 1-1 अशा बरोबरीत सोडवल्या होत्या.  1994 मध्ये वेस्ट इंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना 243 धावांनी जिंकला होता. त्यानंतर कॅरेबियन संघाला भारतात कसोटी सामना जिंकता आलेला नाही. 

 

Web Title: India vs West Indies: can west indies ended 35 years series won drot?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.