दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची निवड, या दिग्गज खेळाडूचं पुनरागमन

निवड करण्यात आलेल्या संघात तीन सलामिवीर, दोन वकेटकिपर, दोन अष्टपैलू, दोन फिरकी गोलंदाज आणि चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 12:12 PM2018-01-28T12:12:29+5:302018-01-29T18:37:45+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa: BCCI announce squad for T20Is, Suresh Raina in but Ajinkya Rahane out | दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची निवड, या दिग्गज खेळाडूचं पुनरागमन

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची निवड, या दिग्गज खेळाडूचं पुनरागमन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेविरोधातील टी-20 मालिकेसाठी आज बीसीसीआयनं विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात टी-20 स्पेशालिस्ट सुरेश रैनानं पुनरागमन केलं आहे. तर अजिंक्य रहाणेला संघातून वगळण्यात आलं आहे. मुंबईकर शार्दुल ठाकूर आणि जयदेव उडाटकटलाही 16 णांमध्ये संधी देण्यात आली आहे. धोनीच्या साथीला अतिरिक्त विकेटकिपर म्हणून दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे.

निवड करण्यात आलेल्या संघात तीन सलामिवीर, दोन वकेटकिपर, दोन अष्टपैलू, दोन फिरकी गोलंदाज आणि चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. मधल्या फळीतील जबाबदारी विराट, रैना आणि मनिष पांड्याच्या खांद्यावर असणार आहे. 

असा आहे भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा,  केएल राहुल, एम.एस. धोनी(WK), दिनेश कार्तित (WK), हार्दिक पांड्या, मनिष पांडे, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदिप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह,  जयदेव उनाडकट आणि शार्दुल ठाकूर 




सुरेश रैना अखेरचा टी-20 सामना गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला संधी मिळाली नव्हती. मात्र नुकत्याच झालेल्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती. यामध्ये एका वेगवान शतकाचाही समावेश होता. त्याचीच पावती म्हणून त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती घेतलेल्या शिखर धवनचाही संघात समावेश आहे. तर याच मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या जयदेव उनाडकटलाही दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर सहा सामन्यांच्या वन डे मालिकेला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. 16 फेब्रुवारीला या मालिकेतला अखेरचा आणि सहावा वन डे सामना झाल्यानंतर 18 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर 21 आणि 24 फेब्रुवारीला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा टी-20 सामना खेळवण्यात येईल.  

Web Title: India vs South Africa: BCCI announce squad for T20Is, Suresh Raina in but Ajinkya Rahane out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.