India vs South Africa : द. आफ्रिकेची (च)हलचल; भारताच्या फिरकीपुढे लोटांगण, विराटसेनेची २-० आघाडी

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा दाणादाण उडाली. सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेटनं पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 06:02 PM2018-02-04T18:02:00+5:302018-02-04T18:11:57+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa: The Africa's (f) stir; India's spin trio, Viratseen's 2-0 lead | India vs South Africa : द. आफ्रिकेची (च)हलचल; भारताच्या फिरकीपुढे लोटांगण, विराटसेनेची २-० आघाडी

India vs South Africa : द. आफ्रिकेची (च)हलचल; भारताच्या फिरकीपुढे लोटांगण, विराटसेनेची २-० आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सेंच्युरियन - दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा दाणादाण उडाली. सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेटनं पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारतीय फिरकी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा 118 धावांत खुर्दा केला. त्यानंतर फलंदाजी करताना कोहली-धवनने संयमी फलंदाजी करत भारताला विराट विजय मिळवून दिला.  सलामिवीर रोहित शर्मा 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर कोहली आणि शिखरनं दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागिदारी करत भारताला एकहाती विजय मिळवून  दिला.  धवनने अर्धशतक करत विजयात मोलाचा वाटा उचलला. विराट कोहलीनं 43 धावांची नाबाद खेळी केली.   या विजयासह भारतानं सहा एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. 

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना भारतीय फिरकीसमोर सपशेल लोटांगण घेतलं.  यजुवेंद्र चहल आणि कुलदीपनं आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. चहल-कुलदीप या फिरकी जोडीनं आफ्रिकेच्या आठ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. चहलनं पाच तर कुलदीपनं तीन विकेट घेतल्या. फिरकी माऱ्यापुढे खेळताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्याचे पहायला मिळाले.  युझवेंद्र चहल वनडे सामन्यात सेंच्युरियन मैदानात 5 विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरला.  भुवनेश्वर आणि बुमराहनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. आफ्रिकेच्या सहा फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. 32.2 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा डाव 118 धावांत संपुष्टात आला.  

India vs South Africa : पंचाच्या त्या हास्यस्पद निर्णयावर वैतागला कोहली )

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवत 118 धावांमध्ये आफ्रिकेचा खुर्दा उडवला. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत आफ्रिकेला सुरुवातीच्या षटकांत चार झटके  दिले. त्यांच्या 4 विकेट्स केवळ 14 षटकांत गेल्या होत्या. त्यावेळी धावफलकावर केवळ 53 धावाच होत्या. झोंडो (25), जेपी ड्युमिनी(25), मॉरीस (14), हाशिम अमला (23), डिकॉक (20),कर्णधार एडिन मार्करम (8) आणि डेविड मिलर (0) यांना आपल्या लौकीकास साजेशा खेळ करता आला नाही.  कुलदीप यादवने एडिन मार्करम आणि डेविड मिलरला बाद केले तर भुवनेश्वर कुमारने हाशिम अमला (२३) तर युझवेन्द्र चहलने डिकॉकला (२०) बाद करत आफ्रिकेला अडचणीत टाकले होते. 

 

(India vs South Africa : दिग्गजांना डावलून द. आफ्रिकेने 'या' नवोदिताला केलं कर्णधार!, अनुभव फक्त दोन सामन्याचा)

दक्षिण आफ्रिका संघाला दुखापतीने ग्रासले आहे. एबीनंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. उर्वरित एकदिवसीय सामन्यांसाठी एडेन मार्कराम याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एडेन मार्करामचा हा तिसराच वन-डे सामना आहे. आणि त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या आमला, डिकॉक, ड्युमीनी आणि मिलरसारखे दिग्गज असतानाही कर्णधारपदाची माळ मार्करामच्या गळ्यात पडली आहे. मार्करामने 22 ऑक्टोबर2017 मध्ये बांगलादेश विरोधात पदार्पण केलं होतं.   मार्कराम दक्षिण आफ्रिकेचा दुसरा सर्वात तरुण कर्णधार असून जगातील 11 वा सर्वात तरुण वन-डे कर्णधार आहे. त्याने आफ्रिकाकडून 2 वनडे, 6 कसोटी सामने खेळले असून वनडेत 75 तर कसोटीत 520 धावा केल्या आहेत. एडिन मार्करम दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील 1991 पासूनचा 13 वा कर्णधार ठरला आहे.  

 

Web Title: India vs South Africa: The Africa's (f) stir; India's spin trio, Viratseen's 2-0 lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.