India Vs South Africa 2018 : महेंद्रसिंग धोनीकडे दोन वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची नामी संधी

महेंद्रसिंग धोनीकडे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. तसंच स्टम्पच्या मागे 400 विकेट्स पूर्ण करत नवा रेकॉ़र्ड आपल्या नावे करण्याची संधीही धोनीकडे आहे.   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 06:52 PM2018-01-31T18:52:58+5:302018-01-31T18:57:44+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa 2018: Mahendra Singh Dhoni has a good chance to become fourth batsman to complete 10 thousand run | India Vs South Africa 2018 : महेंद्रसिंग धोनीकडे दोन वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची नामी संधी

India Vs South Africa 2018 : महेंद्रसिंग धोनीकडे दोन वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची नामी संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

डर्बन - दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचं लक्ष एकदिवसीय मालिकेकडे आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान गुरुवारपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिका गमावलेला भारतीय संघ एकदिवसीय मालिकेतून पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यावेळी भारतीय संघाच्या सोबतीला असणार आहे. धोनीकडे एकदिवसीय मालिकेत अनेक रेकॉर्ड करण्याची नामी संधी आहे. 
          
महेंद्रसिंग धोनीकडे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. तसंच स्टम्पच्या मागे 400 विकेट्स पूर्ण करत नवा रेकॉ़र्ड आपल्या नावे करण्याची संधीही धोनीकडे आहे.   

महेंद्रसिंग धोनीला 10 हजाराचा आकडा गाठण्यासाठी फक्त 102 धावांची गरज आहे. 10 हजार धावा पूर्ण केल्यास हा पराक्रम करणारा धोनी जगातील 12 वा आणि भारतातील चौथा फलंदाज होईल. महेंद्रसिंग धोनीच्या आधी सचिन तेंडुलकर (18426), सौरव गांगुली (11363) आणि राहुल द्रविड (10889) यांनी 10 हजाराचा पल्ला गाठला आहे.                                     

धोनीला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पुर्ण करण्यासाठी फक्त 102 धावा हव्या असून, या मालिकेत धोनी हा रेकॉर्ड अत्यंत सहजपणे करेल असं म्हटलं जात आहे. धोनीने आतापर्यंत 312 सामन्यांमधील 268 डावांमध्ये 51.55 च्या सरासरीने 9898 धावा केल्या आहेत.

पद्मभूषण पुरस्कार मिळणारा धोनी ठरला दहावा क्रिकेटपटू
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणा-या पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला करण्यात येते. यंदाच्या वर्षात पुरस्कारासाठी 15,700 लोकांनी अर्ज केला होता. त्यातील अनेकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यात भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला पदमभूषण हा देशाचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला.
सप्टेंबर महिन्यात बीसीसीआयने धोनीच्या नावाची यासाठी शिफारस केली होती. हे पुरस्कार एप्रिल महिन्यात देण्यात येणार आहेत. यापूर्वी लिटिल ब्लास्टर सुनील गावसकर, कपिल देव, राहुल द्रविड, चंदू बोर्डे, प्रोफेसर डीबी देवधर, सीके नायडू, लाला अमरनाथ, विनू मंकड, विजय आनंद यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Web Title: India vs South Africa 2018: Mahendra Singh Dhoni has a good chance to become fourth batsman to complete 10 thousand run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.