India Vs New Zealand World Cup Semi Final : भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण, हार्दिक पांड्यानं मैदान सोडलं

India Vs New Zealand World Cup Semi Final : भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात टीम इंडियाने पहिल्या दहा षटकांत वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 04:27 PM2019-07-09T16:27:03+5:302019-07-09T16:34:29+5:30

whatsapp join usJoin us
India Vs New Zealand World Cup Semi Final : Injury concerns for India with Hardik Pandya departing the field at the end of his fourth over | India Vs New Zealand World Cup Semi Final : भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण, हार्दिक पांड्यानं मैदान सोडलं

India Vs New Zealand World Cup Semi Final : भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण, हार्दिक पांड्यानं मैदान सोडलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात टीम इंडियाने पहिल्या दहा षटकांत वर्चस्व गाजवले. जसप्रीत बुमराहनं दुसऱ्याच षटकात किवींना धक्का दिला. त्यानं मार्टिन गुप्तीलला दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार विराट कोहलीकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. पण, भारताची चिंता वाढवणारा प्रसंग या सामन्यात घडला. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं 16व्या षटकानंतर मैदान सोडले. 

बुमराह व भुवनेश्वर कुमार यांच्या टिच्चून माऱ्यासमोर न्यूझीलंडला पहिल्या दहा षटकांत 1 बाद 27 धावा करता आल्या. भुवीनं पाच षटकांत 1 निर्धाव षटक टाकून 13 धावा दिल्या, तर बुमराहने 4 षटकांत 10 धावांत 1 विकेट घेतली. त्यात एक निर्धाव षटकही आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या पॉवर प्लेमधील ही निचांक धावसंख्या ठरली. भारताने याच स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध पहिल्या दहा षटकातं 1 बाद 28 धावा केल्या होत्या. 

पायाचे स्नायू ताणले गेल्यामुळे पांड्याला मैदान सोडावे लागले. 16 व्या षटकानंतर तो मैदानाबाहेर गेला. आता त्याची ही दुखापत किती गंभीर आहे हे लवकर कळेलच. पांड्याने 4 षटकांत 17 धावा दिल्या आहेत.







बुमराहची 36 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; झहीर खानला टाकणार का मागे?
बुमराहने विकेट घेत एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 18 विकेट घेण्याच्या झहीरच्या विक्रमाशी बरोबरी केली. झहीरने  2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 18 विकेट घेतल्या होत्या. उमेश यादव ( 2015) आणि रॉजर बिन्नी ( 1983) यांनीही एका वर्ल्ड कप स्पर्धेत 18 विकेट घेतल्या आहेत. एकाच वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 21 विकेट घेण्याचा भारतीय गोलंदाजाचा विक्रम झहीरच्या नावावर आहे आणि बुमराहला तो विक्रम खुणावत आहे.  

मोहम्मद शमीला वगळल्यानं 'दादा' नाराज, हर्षा भोगलेनं व्यक्त केलं आश्चर्य
भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्यानंतर मोहम्मद शमीला खेळण्याची संधी मिळाली. शमीनं मिळालेल्या संधीचं सोनं करताना चार सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, भुवनेश्वर कुमारने तंदुरूस्त होत संघात पुन्हा स्थान पटकावलं. अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शमीला विश्रांती देत भुवीनं पुनरागमन केले होते. पण, आजच्या सामन्यात शमीला संधी देण्यात यावी अशी सर्वांची मागणी होती. पण, कोहलीनं भुवी आणि जसप्रीत बुमराह यांच्यासहच मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला. 

समालोचकाच्या कक्षात असलेल्या गांगुलीनं या निर्णयावर नाराजी प्रकट केली. त्याच्या मताशी सहमती दर्शवताना हर्षा भोगलेनेही ट्विट केलं. त्यानं लिहिलं की,'' गांगुलीप्रमाणे मीही शमीला न खेळवण्याच्या निर्णयावर नाराज आहे. त्याने विकेट्स घेतल्या आहेत. रवींद्र जडेजाच्या उपस्थितीत आपल्याकडे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाज होते. शिवाय कुलदीप यादवची किवीविरुद्ध कामगिरी चांगली होती, तरीही त्याला वगळण्याचा निर्णयाला धाडस म्हणावं का.'' 

Web Title: India Vs New Zealand World Cup Semi Final : Injury concerns for India with Hardik Pandya departing the field at the end of his fourth over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.