India vs Australia, 2nd ODI: नागपूरच्या मैदानात धोनीच आहे क्रिकेट जगतातील सरस फलंदाज

सध्या चर्चा आहे ती फक्त आणि फक्त धोनीचीच.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 03:01 PM2019-03-04T15:01:21+5:302019-03-04T15:02:34+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 2nd ODI: ms Dhoni is highest run scorer in Nagpur, the average is 134... | India vs Australia, 2nd ODI: नागपूरच्या मैदानात धोनीच आहे क्रिकेट जगतातील सरस फलंदाज

India vs Australia, 2nd ODI: नागपूरच्या मैदानात धोनीच आहे क्रिकेट जगतातील सरस फलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना नागपूरला उद्या होणार आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात हा सामना होणार आहे. हे मैदान महेंद्रसिंग धोनीसाठी फार लकी ठरलेले आहे. कारण या मैदानात सर्वाधिक धावा धोनीच्याच नावावर आहे. कारण धोनीची या मैदानात सरासरी आहे ती तब्बल 134 एवढी.

धोनीने या मैदानात आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. या पाच पैकी चार सामन्यांमध्ये धोनीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. या चार डावांमध्ये धोनीने दोनदा नाबाद राहून 268 धावा बनवल्या आहेत. या चार सामन्यांमध्ये त्याची सरासरी 134 एवढी आहे आणि यामध्ये दोन शतकांचाही समावेश आहे. धोनीनंतर या मैदानात सर्वाधिक धावांच्या यादीमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीच्या नावावर 209 धावा आहेत. 


वीसीए स्टेडियममध्ये सर्वाधिक रन बनवणारे फलंदाज (वनडे):

268 रन- महेंद्रसिंग धोनी (2 शतक)

209 रन- विराट कोहली (1 शतक, 1 अर्धशतक)

204 रन- रोहित शर्मा (1 शतक, 1 अर्धशतक)

183 रन- शेन वॉटसन (1 शतक, 1 अर्धशतक)

158 रन- सचिन तेंडुलकर (1 शतक)

नवीन वर्ष सुरु झाले. दोन महिने उलटले. पण या दोन महिन्यांमध्ये ना रोहित शर्माचे नाव घेतले जाते किंवा ना विराट कोहलीचे नाव जास्त घेतले जाते. कारण सध्या चर्चा आहे ती फक्त आणि फक्त धोनीचीच. कारण महेंद्रसिंग धोनीची या वर्षातील कामिगरी डोळे दिपावणारी आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये पुन्हा एकदा तोच जुना धोनी पाहायला मिळत असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या वर्षी धोनी विश्वचषकात खेळणार की नाही, यावर जोरदार चर्चा सुरु होती. पण या चर्चेला धोनीनेच आपल्या कामगिरीच्या जोरावर पूर्णविराम दिला आहे. या वर्षी धोनीने 6 डावांमध्ये  150.50च्या सरासरीने 301 धावा बनवल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश असूनतो चारवेळा नाबाद ठरला आहे. यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी आठव्या स्थानावर आहे, तर सरासरीच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.

Web Title: India vs Australia, 2nd ODI: ms Dhoni is highest run scorer in Nagpur, the average is 134...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.