India Vs South Africa 2018 : आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप भारताकडेच

भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधात तिसºया आणि अखेरच्या कसोटी सामन्यात नाट्यमय विजय मिळवला. त्यासोबतच विराट आणि संघाने आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकासह कसोटी चॅम्पियनशीप आपल्याकडेच कायम राखत दहा लाख डॉलर रकमेचे पारितोषिक पटकावले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 01:10 AM2018-01-28T01:10:02+5:302018-01-28T01:11:30+5:30

whatsapp join usJoin us
India Retain ICC Test Championship | India Vs South Africa 2018 : आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप भारताकडेच

India Vs South Africa 2018 : आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप भारताकडेच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जोहान्सबर्ग : भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधात तिसºया आणि अखेरच्या कसोटी सामन्यात नाट्यमय विजय मिळवला. त्यासोबतच विराट आणि संघाने आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकासह कसोटी चॅम्पियनशीप आपल्याकडेच कायम राखत दहा लाख डॉलर रकमेचे पारितोषिक पटकावले आहे.
वाँडरर्सवर मिळवलेल्या विजयामुळे दक्षिण आफ्रिका संघ आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये भारतापुढे जाऊ शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेने येत्या मार्चमध्ये आॅस्ट्रेलियात होणाºया कसोटी मालिकेतील चारही सामने जिंकले तरी या रँकिंगमध्ये फरक पडणार नाही. रँकिंगची कट आॅफ तारीख ३ एप्रिल आहे. भारतीय संघ १२४ गुणांसह दक्षिण आफ्रिकेत पोहचला हात. त्या वेळी दक्षिण आफ्रिकेचे १११ गुण होते. आता भारताचे १२१ गुण होतील. तर दक्षिण आफ्रिकेचे ११५ गुण आहेत. मात्र त्यासोबतच भारताने आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची गदा आपल्याकडेच कायम ठेवली आहे. कोहलीला ही गदा एका सोहळ्यात दिली जाणार आहे.
त्याची तारीख नंतर जाहीर होईल.


भारताने द. आफ्रिकेची जिरवली

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारताने तिसºया आणि अखेरच्या लढतीत विजय मिळवत लाज राखली आहे. दुसºया डावात भारताने दिलेले २४१ धावांचे आव्हान दक्षीण आफ्रिकेच्या संघाला पुर्ण करता आले नाही.
अखेरच्या कसोटी सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो मोहम्मद शमी. शमीने दुसºया डावात पाच बळी घेत संघाला पुनरागमन करून दिले.
भारताचे आव्हान पूर्ण करताना डीन एल्गर (नाबाद ८६) आणि हाशीम आमला (५२) यांनी भारतीय गोलंदाजांवर चांगला दबाव ठेवला.
मात्र इशांत शर्माने आमलला बाद केले. त्यानंतर शमी याने एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. भुवनेश्वर कुमार याने एक तर बुमराह याने दोन बळी घेत शमीला चांगली साथ दिली.
जसप्रीत बुमराह याने पुन्हा एकदा डिव्हिलियर्सला बाद करत तंबूत परत पाठवले. त्यानंतर आफ्रिकेचा एकही फलंदाज संघाचा पराभव टाळू शकला नाही. 

धावफलक :

दक्षीण आफ्रिका : एडेन मार्करम झे. पार्थिव गो. शमी ४, डीन एल्गर नाबाद ८६, हाशिम आमला झे. पंड्या गो. शर्मा ५२, एबी डिव्हिलियर्स झे. रहाणे गो. बुमराह ६, फाफ डू प्लेसिस त्रि. गो. शर्मा २, क्विंटन डीकॉक पायचीत गो. बुमराह 0, वर्नोन फिलँडर त्रि. गो. मोहंमद शमी १0, अँडिले फेहलुकवायो त्रि. गो. मोहंमद शमी 0, कागिसो रबाडा झे. पुजारा गो. कुमार 0, मॉर्नी मॉर्केल त्रि. गो. मोहंमद शमी 0, लुंगी एनगिडी झे. राखीव (कार्तिक) गो. मोहंमद शमी ४, अवांतर १३, एकूण : ७३.३ षटकांत सर्वबाद १७७. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १८-४-३९-१, मोहम्मद शमी १२.३-२-२८-५, जसप्रीत बुमराह २१-३-५७-२, इशांत शर्मा १६-३-३१-२, हार्दिक पांड्या ६-१-१५-0.

Web Title: India Retain ICC Test Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.