अजून एकढी वर्षे खेळू शकतो, भारताचा कर्णधार विराट कोहलीने वर्तवला अंदाज

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच आटोपलेल्या श्रीलंका दौऱ्यातही जबरदस्त कामगिरी केल्यानंतर आता विराटने आपल्या क्रिकेट कारकिर्दीविषयी मोठा अंदाज वर्तवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 10:33 PM2017-09-08T22:33:20+5:302017-09-08T22:40:27+5:30

whatsapp join usJoin us
India captain Virat Kohli can play for a number of years | अजून एकढी वर्षे खेळू शकतो, भारताचा कर्णधार विराट कोहलीने वर्तवला अंदाज

अजून एकढी वर्षे खेळू शकतो, भारताचा कर्णधार विराट कोहलीने वर्तवला अंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, दि. 8 - भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच आटोपलेल्या श्रीलंका दौऱ्यातही जबरदस्त कामगिरी केल्यानंतर आता विराटने आपल्या क्रिकेट कारकिर्दीविषयी मोठा अंदाज वर्तवला आहे. शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना विराटने सांगितले की, माझ्यामध्ये अद्याप आठ वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे. मात्र तंदुरुस्ती आणि कठोर परिश्रम कायम ठेवले तर मी अजून दहा वर्षापर्यंत खेळू शकतो.
कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करणाऱ्या विराटने गेल्या काही काळात फलंदाजीमधील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. तसेच अनेक विक्रम त्याच्या रडारवर आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात शतक फटकावले होते. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 30वे शतक ठरले होते. त्याबरोबरच तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता.
यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा शतके आणि सात अर्धशतकांसह 1639 धावा फटकावणारा कोहली एका कार्यक्रमात संवाद साधताना म्हणाला, माझ्या कामगिरीत सातत्याने होत असलेल्या सुधारणेमागे कोणतेही गुपित नाही. आम्ही रोज किती मेहनत करतो हे अनेकांना ठावूक नाही. माझ्यातील चांगली कामगिरी करण्याची भूक कधीही संपत नाही. मी शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न करतो. भविष्याचा विचार केला तर माझ्यामध्ये आठ वर्षे आणि अधिक मेहनत घेतल्यास दहा वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे. मी रोज नव्याने सुरुवात करतो आणि अनेक छोट्या छोट्या बाबीसुद्धा माझ्यादृष्टीने महत्त्वाच्या असतात."
श्रीलंका दौ-यातील यश शानदार ठरले. या यशाचे सर्व श्रेय सांघिक कामगिरीला जाते, असे सांगतानाच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ही कामगिरी विशेष असल्याचेही म्हटले. बुधवारी झालेल्या टी-२० सामन्यात बाजी मारून भारताने ३ सामन्यांची कसोटी मालिका, ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकतानाच लंका दौºयात एकही सामना गमावला नाही. बुधवारी झालेल्या दौºयातील एकमेव टी-२० सामना जिंकल्यानंतर कोहली म्हणाला, ‘‘हे यश खूप विशेष आहे. दौऱ्यातील प्रत्येक मालिकेत क्लीन स्वीप देण्याची कामगिरी यापूर्वी कधीही झाली नव्हती. या कामगिरीचे सर्व श्रेय खेळाडूंना जाते. आमची बेंच स्ट्रेंथ मजबूत असून या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. या दौºयात आम्ही काही प्रयोगही केले आणि ते यशस्वी ठरले.’’ कोहलीने एकदिवसीय मालिकेसह टी-२० सामन्यांतही चांगली कामगिरी केली. याबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘‘माझ्या कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास मी कायम माझ्या मजबूत बाजूंकडे लक्ष देतो आणि नेहमी पारंपरिक फटके खेळण्यावर भर देतो. खेळाच्या प्रत्येक प्रकारानुसार मी स्वत:चा खेळ बदलण्यावर भर देतो. ’’

Web Title: India captain Virat Kohli can play for a number of years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.