IND vs AUS : राहुलची कारकीर्द संपलीय, मग त्याला संघांत घेण्याचा अट्टाहास का? नेटिझन्सचा संतप्त सवाल 

IND vs AUS: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 11:21 AM2018-12-25T11:21:39+5:302018-12-25T11:22:53+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS: why Lokesh Rahul in ODI team? netizens ask question to bcci | IND vs AUS : राहुलची कारकीर्द संपलीय, मग त्याला संघांत घेण्याचा अट्टाहास का? नेटिझन्सचा संतप्त सवाल 

IND vs AUS : राहुलची कारकीर्द संपलीय, मग त्याला संघांत घेण्याचा अट्टाहास का? नेटिझन्सचा संतप्त सवाल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीरवन डे आणि ट्वेंटी संघात महेंद्रसिंग धोनीचे पुनरागमनलोकेश राहुलला संधी दिल्याने नेटिझन्स संतप्त

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. न्यूझीलंडविरुद्ध वन डे आणि ट्वेंटी-20 मालिकेसाठी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी निवडलेल्या संघात बरेच समान चेहरे आहे. यात महेंद्रसिंग धोनी हे सर्वांचा हवेहवेसे नाव आहे, परंतु एका नावाने नेटिझन्सचे डोकं फिरवलं आहे. 

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती दिलेल्या धोनीने संघात कमबॅक केले आहे. रिषभ पंत आणि मनिष पांडे यांना वगळण्यात आले आहे. पंत आणि पांडे यांना 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न सोडण्याचा सूचक इशारा निवड समितीने दिला आहे. पंतला ट्वेंटी-20 संघातून डच्चू मिळाला असताना सुरेश रैनाचे नाव नसल्याने नेटिझन्स नाराज झाले. रैनाने रणजी करंडक स्पर्धेत सलग दोन अर्धशतक झळकावली आहेत. 



मात्र, वन डे आणि ट्वेंटी-20 संघात लोकेश राहुलच्या समावेशाने नेटिझन्सना राग अनावर झाला. सातत्याने निराशाजनक कामगिरी करूनही राहुलला संघात का संधी मिळते, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांनी केला. काहिंनी बीसीसीआयच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.







 

Web Title: IND vs AUS: why Lokesh Rahul in ODI team? netizens ask question to bcci

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.