ICC World Cup 2019 : इंग्लंडमध्ये क्रिकेटचे सामने नसताना काय पाहाल? 

क्रिकेटप्रेमींसाठी इंग्लंडमध्ये क्रिकेटशी संबंधित बघण्यासारखे आहे भरपूर काही....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 03:39 PM2019-05-31T15:39:34+5:302019-05-31T15:39:59+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: What will yoe see when there are no cricket matches in England? | ICC World Cup 2019 : इंग्लंडमध्ये क्रिकेटचे सामने नसताना काय पाहाल? 

ICC World Cup 2019 : इंग्लंडमध्ये क्रिकेटचे सामने नसताना काय पाहाल? 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- ललित झांबरे 
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनिमित्ताने इंग्लंडमध्ये जगभरातील, विशेषतः भारतातील क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली आहे. प्रत्येक सामन्याच्या ठिकाणी जवळपास निम्मी तिकीटे भारतीय क्रिकेटप्रेमींचीच आहेत. क्रिकेट सामना आहे तोवर ठीक पण क्रिकेटचा सामना नसताना या क्रिकेटवेड्या जिवांनी काय करायचं? कुठे जायचं? तर फिकर नॉट...इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या सामन्यांशिवायही क्रिकेटशी संबंधित बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यात क्रिकेटची मक्का लॉर्डसवरील क्रिकेट म्युझीयम आहे, शेफिल्ड येथील ब्रामाल लेन आहे,  जॅक रसेल गॅलरी आहे, वार्मस्ली पार्क , वासर्सेस्टरचा न्यू रोड, होव येथील टोनी ग्रेग कॅफे आहे. 

लंडनमधील लॉर्डस् मैदान हे क्रिकेटची मक्का. तेथील पॅव्हिलीयनच्या मागे आहे अतिशय दूर्मिळ वस्तू जतन केलेले एमासीसी म्युझीयम. याठिकाणी डब्ल्यु. जी. ग्रेस यांच्या बॅटपासून अगदी अलीकडचा खेळाडू जोफ्रा आर्चरच्या स्वाक्षरीचा शर्ट अशा क्रिकेटशी संबंधित वस्तूंचा संग्रह आहे. येथील मुख्य आकर्षण आहे ते सुप्रसिद्ध  अॅशेस रक्षापात्र. 

शेफिल्ड येथील ब्रामाल लेन हे शेफिल्ड युनायटेड फूटबॉल क्लबचे सध्या माहेरघर आहे परंतु 32 हजार प्रेक्षक क्षमतेच्या या स्टेडियमवर क्रिकेटचे कसोटी सामनेही खेळले गेले आहेत. 1902 च्या अॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना येथे खेळला गेला होता. 1973 पर्यंत येथे यॉर्कशायर काऊंटीचे सामने होत होते. मात्र त्यानंतर येथे फूटबॉल प्रेक्षकांसाठी एक कायमस्वरुपी स्टँड उभारण्यात आले, त्यात क्रिकेटची खेळपट्टी गेली आणि येथील क्रिकेट बंद पडले. जेफ बॉयकॉट यांचे हे आवडते मैदान होते. 

चिपिंग सोडबरी येथील जॅक रसेल  गॅलरी हे आणखी एक पर्यटनस्थळ. जॅक रसेल हा इंग्लंड व ग्लोसेस्टरशायरचा यष्टीरक्षक. तो उत्तम रेखाचित्रकारसुध्दा आहे. रसेलचे फारसे मित्र नव्हते म्हणून फावल्या वेळेत त्याची ही कला बहरली. त्याच्या कलाकृतींचे हे संग्रहालय आहे. 
वॉर्मस्ली पार्क हे इंग्लंडमधील सर्वात सुंदरा क्रिकेट मैदान मानले जाते. आतेलसम्राट जॉन पॉल गेटी ज्युनियर यांच्या मुलाच्या मालकीचे हे मैदान. 

विश्वयुध्दाच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद असले तरी काउंटी क्रिकेट सुरुच होते आणि त्याच्या बहुतेक लढती रमणीय आशा न्यू रोड, वॉर्सेस्टर मैदानावर व्हायच्या. हे मैदानसुध्दा पर्यटनस्थळ आहे, या मैदानाजवळ झांडामधून डोकावणारे कॅथेड्रलचे शिखर आणि येथील मनमिळावू लोकं येथील लोकप्रियता वाढवतात. येथील लेडीज  पॅव्हिलियनमध्ये चहापानावेळी मिळणारे स्वादिष्ट केक चुकवू नयेत असा सल्ला स्थानिक देतात. 

एडिनबर्ग येथील ग्रँजे क्रिकेट क्लब हे स्कॉटलंडमधील मैदान अतिशय देखणे आणि ऐतिहासिकसुध्दा आहे. 1832 मध्ये स्थापन झालेला हा क्लब म्हाणजे स्कॉटीश क्रिकेटचे माहेरघर आहे. 

होव येथील टोनी ग्रेग कॅफे या नावानेच येथे वेगळे काहीतरी बघायला मिळणार याची कल्पना येते. टोनी ग्रेग हा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू, माजी कर्णधार, टेलिव्हिजन समालोचक. मात्र ससेक्सचे होम ग्राउंड असलेल्या होव येथील सामन्यांची खासियत म्हणजे टोनी ग्रेग लंचरुम. 2000 मध्ये ही लंच रुम पाडण्यात आली, त्यानंतर यांदा फेब्रुवारीत तेथील कॅफे पुन्हा सुरु करण्यात आला आणि त्याला टोनी ग्रेग यांचे नाव देण्यात आले. येथे सकाळी 9 ते 3 दरम्यन चहा आणि केकचा आस्वाद क्रिकेटप्रेमींना घेता येतो. 

अप्पर ब्रौटन येथील द टॅप अँड रन ही स्ट्युअर्ट ब्रॉड व हॅरी गुर्नी यांनी सुरु केलेली पबची चेन. संडे रोस्ट ही त्यांची स्पेशालिटी. आणि त्याच्या जोडीला खेळांचे थेट प्रक्षेपण. म्हणून टॅप अँड रनला तुम्ही गेलात तरी खेळ बघायला मिळणार नसल्याची भिती नाही. 
ऑक्साफर्डशायरमधील गॅरी पाल्मर क्रिकेट प्रायोगशाळा हे आणखी एक भेट देण्यासारखे ठिकाण. एकेकाळी बोथमचा वारसदार म्हणून पाल्मर ओळखला जायचा पण त्या अपेक्षा तो कधीच पूर्ण करू शकला नाही. मात्र त्याने गेल्या काही वर्षात कितीतरी आघाडीच्या खेळाडूंशी चर्चा व अभ्यास करुन  सलामी फलंदाजांचा चेंडू ड्राईव्ह करताना फ्रंट फूटवरचा स्टान्स कसा असावा याचा अभ्यास व संशोधन केले आहे. त्याच्या या संशोधनाचा अॅलिस्टर कूक याला फायदासुध्दा झाला. तर या प्रयोगशाळेत पाल्मरचे मार्गदर्शन इच्छुकांना उपलब्ध होत असते. तर इंग्लंडमध्ये क्रिकेटचा सामना असो वा नसो, क्रिकेटप्रेमींना बघाण्यासाराखे भरपूर आहे.

Web Title: ICC World Cup 2019: What will yoe see when there are no cricket matches in England?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.