ICC World Cup 2019 : न्यूझीलंडने अफगाणिस्तानला स्वस्तात गुंडाळले, निशॅमचे पाच बळी

ICC World Cup 2019:जिमी निशॅम आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तान संघाने शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 10:06 PM2019-06-08T22:06:17+5:302019-06-08T22:08:05+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: New Zealand wrap up Afghanistan, they are all out on 172 runs | ICC World Cup 2019 : न्यूझीलंडने अफगाणिस्तानला स्वस्तात गुंडाळले, निशॅमचे पाच बळी

ICC World Cup 2019 : न्यूझीलंडने अफगाणिस्तानला स्वस्तात गुंडाळले, निशॅमचे पाच बळी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टौंटन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जिमी निशॅम आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तान संघाने शरणागती पत्करली. वर्ल्ड कप स्पर्धेतील शनिवारच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनेअफगाणिस्तान संघाला 172 धावांत गुंडाळले. निशॅमने ( 5/31) पाच विकेट घेत न्यूझीलंडच्या दिग्गज गोलंदाजांच्या पंक्तित स्थान पटकावले. वर्ल्ड कप स्पर्धेत एका सामन्यात पाच विकेट घेणारा तो न्यूझीलंडचा पाचवा गोलंदाज ठरला. यापूर्वी रिचर्ड हॅडली ( वि. श्रीलंका, 1983), शेन बाँड ( वि. ऑस्ट्रेलिया 2003), टीम साऊदी ( वि. इंग्लंड 2015) आणि ट्रेंट बोल्ट ( वि. ऑस्ट्रेलिया 2015) यांनी अशी कामगिरी केली आहे. निशॅमला फर्ग्युसनची तोडीस तोड साथ लाभली. फर्ग्युसनने 4 विकेट घेतल्या.



अफगाणिस्तानकडून हझरत झाझल ( 34), नूर अली झाद्रान ( 31), हशमदुल्लाह शाहीदी ( 59)  यांनीच समाधानकारक कामगिरी केली. बिनबाद 60 धावांवरून अफगाणिस्तानची अवस्था 4 बाद 70 अशी दयनीय झाली होती. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 172 धावांत तंबूत परतला. 



 

Web Title: ICC World Cup 2019: New Zealand wrap up Afghanistan, they are all out on 172 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.