स्मृती मानधनाला कसा मिळाला शिवछत्रपती पुरस्कार, तुम्हाला माहिती आहे का...

नुकत्याच जाहीर केलेल्या यादीमध्ये एकाच क्रिकेटपटूला हा पुरस्कार देण्यात आला आहे आणि ती आहे स्मृती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 04:46 PM2019-02-13T16:46:39+5:302019-02-13T16:47:30+5:30

whatsapp join usJoin us
How did smriti mandhana get the Shiv Chhatrapati Award, did you know ... | स्मृती मानधनाला कसा मिळाला शिवछत्रपती पुरस्कार, तुम्हाला माहिती आहे का...

स्मृती मानधनाला कसा मिळाला शिवछत्रपती पुरस्कार, तुम्हाला माहिती आहे का...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताची अव्वल महिला फलंदाज स्मृती मानधनाला महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पण या पुरस्कारासाठी स्मृतीचीच निवड का करण्यात आली, ते जाणून घ्या.

महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2017-18 या वर्षामध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो. नुकत्याच जाहीर केलेल्या यादीमध्ये एकाच क्रिकेटपटूला हा पुरस्कार देण्यात आला आहे आणि ती आहे स्मृती. कारण स्मृतीने गेल्यावर्षी अविस्मरणीय कामगिरी केली होती. त्यामुळे आयसीसी आणि फोर्ब्सनेही तिचा खास सन्मान केला होता.

स्मृतीची नेत्रदीपक कामगिरी
महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधनाला सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत स्मृतीने वन डे क्रिकेटमधील महिला फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले. तिने तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान गाठले. न्यूझीलंड दौऱ्यात स्मृतीची बॅट चांगलीच तळपली होती. तिने पहिल्या सामन्यात शतकी खेळी करताना जेमिमा रॉड्रीग्जसह 190 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. 2018 या वर्षातील कामगिरीमुळे तिला आयसीसीने सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारानेही गौरविले होते.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने 2-1 अशा विजय मिळवला आणि स्मृतीने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला.  स्मृतीने 2018 वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 15 वन डे सामन्यांत दोन शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली. आयसीसीच्या क्रमवारीत स्मृतीने ( 751) 70 गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचीच मेग लॅनिंग 76 गुणांच्या पिछाडीसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

आयसीसीच्या यादीमध्येही अव्वल
महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधनाला सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या क्रमवारीत स्मृतीने वन डे क्रिकेटमधील महिला फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तिने तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान गाठले. न्यूझीलंड दौऱ्यात स्मृतीची बॅट चांगलीच तळपली होती. तिने पहिल्या सामन्यात शतकी खेळी करताना जेमिमा रॉड्रीग्जसह 190 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. 2018 या वर्षातील कामगिरीमुळे तिला आयसीसीने सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारानेही गौरविले होते.


स्मृतीचा फोर्ब्सकडूनही सन्मान
भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे नाव उज्वल करणाऱ्या हिमा दास यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सने भारताची '30 अंडर 30' अशी एक यादी तयार केली आहे. या यादीमध्ये स्मृती आणि हिमा यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Web Title: How did smriti mandhana get the Shiv Chhatrapati Award, did you know ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.