माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिनच्या प्रकृतीत सुधारणा, ICU मधून बाहेर

भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिनच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला ICUमधून बाहेर काढण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 11:07 AM2019-01-30T11:07:55+5:302019-01-30T11:08:59+5:30

whatsapp join usJoin us
Former cricketer Jacob Martins out of danger | माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिनच्या प्रकृतीत सुधारणा, ICU मधून बाहेर

माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिनच्या प्रकृतीत सुधारणा, ICU मधून बाहेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बडोदा : भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिनच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला ICUमधून बाहेर काढण्यात आले. 27 डिसेंबरला अपघात झाल्यानंतर मार्टिन व्हेंटिलेटरवर होता. उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून त्याच्या पत्नीनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहिले होते. मार्टिन हॉस्पिटलमध्ये असल्याचे समजताच बीसीसीआय आणि भारताच्या आजी-माजी खेळाडूंनी आर्थिक मदत केली. बुधवारी मार्टिनला ICUमधून जनरल वॉर्डात हलवले आहे. त्याने कुटुंबीयांशी गप्पाही मारल्या.

माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली मार्टिनने भारतीय संघात पदार्पण केले होते आणि गांगुलीनेच प्रथम मार्टिनसाठी मदतीचा हात दिला. बडोदा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव संजय पटेल हे मार्टिनच्या मदतीला धावून आले होते. त्यानंतर त्यांनी क्रिकेट क्षेत्रातील अनेक मित्रांना मदतीसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. त्यांच्या या विनंतीला मान राखत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. यासह इरफान पठाण, युसूफ पठाण आणि मुनाफ पटेल हेही मदतीसाठी पुढे आले आहेत.  

सूत्रांच्या माहितीनुसार मार्टिन यांचा हॉस्पिटलचा दिवसाचा खर्च 70000 रुपये होता. बीसीसीआयने त्यांना 5 लाख, तर बडोदा क्रिकेट असोसिएशनने 3 लाख रुपये दिले. मार्टिनने 10 वन डे सामन्यांत 22.57च्या सरासरीने 158 धावा केल्या आहेत. त्याने पाच सामने हे गांगुलीच्या आणि अन्य पाच सामने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळले. 138 प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने 9192 धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली बडोदाने 2000-2001 मध्ये पहिल्यांदा रणजी करंडक उंचावला. 
 

Web Title: Former cricketer Jacob Martins out of danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.