2015 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ झाला ऑल आऊट

कोलकाता वन-डे भारतानं ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी धुव्वा उडवत पाच सामन्यात 2-0नं आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियानं भारताला 50 षटकांत सर्वबाद 252 धावांत रोखलं. 2015 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघावर ऑल आउट होण्याची नामुष्की ओढावली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 10:56 PM2017-09-21T22:56:20+5:302017-09-21T22:56:35+5:30

whatsapp join usJoin us
For the first time since 2015, the Indian team went out all over | 2015 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ झाला ऑल आऊट

2015 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ झाला ऑल आऊट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता, दि. 21 - कोलकाता वन-डे भारतानं ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी धुव्वा उडवत पाच सामन्यात 2-0नं आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियानं भारताला 50 षटकांत सर्वबाद 252 धावांत रोखलं. 2015 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघावर ऑल आउट होण्याची नामुष्की ओढावली.  क्रिकबझनं दिलेल्या  माहितीनुसार भारतीय संघ 2015 नंतर वन-डे मध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑल आउट झाला आहे. यापूर्वी 18 जून 2015 ला बांगलादेश मध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने भारताला 228 धावांमध्ये ऑल आउट केले होते. त्यानंतर आज ऑस्ट्रेलिया बरोबरच्या दुसऱ्या वन-डेत भारत तब्बल दोन वर्षांनी ऑल आउट झाला आहे. तर ऑस्ट्रेलियानं भारताला घरच्या मैदानावर ऑल आउट करण्यास सात वर्ष लागली. 2009 मध्ये गुवाहाटी वन-डेत कांगारुंनी भारताला 170 धावांत बाद केलं होतं. तर घरच्या मैदानावर 2013 मध्ये धर्मशाळा वन-डेत भारत ऑल आउट झाला होता. या सामन्यात इंग्लंडनं भारताला ऑल आउट केलं होतं. 

गेल्या दशकापासून भारताची फलंदाजी आधिक मजबूत झाल्याचे दिसून येतं आहे. भारताचे तळातील फलंदाज देखील फलंदाजीत योगदान देतात. यामुळेच भारताला पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑल आउट करण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांना तब्बल दोन वर्षे लागली.
सलामीच नव्हे, तर मधली फळी मजबूत असल्यामुळेच भारतीय संघ धावांची आव्हान उभारताना, दोन वर्षे ऑल आउट झाला नाही. संघात येत असलेले नवे खेळाडू देखील हीच कामगिरी पुढे नेत आहेत. त्यात हार्दिक पांड्या, भुवनेश्वर आणि  केदार जाधव यांचा विशेष उल्लेख करावा लागतो.

आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी पराभव केला. भारताने दिलेलं 253 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाला न पेलवल्याने लागोपाठ दुसऱ्या सामन्यात भारताने विजय संपादन केला आहे.  भारताकडून कुलदीप यादवने सामन्यात हॅट्ट्रीकची नोंद केली. वन-डे सामन्यांमध्ये हॅटट्रीक नोंदवणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वर कुमारनेही ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलला सामन्यात प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर आव्हान कमी होतं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर कांगारु तग धरु शकले नाहीत.

Web Title: For the first time since 2015, the Indian team went out all over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.