रनस्फोट! इंदूर टी-२०मध्ये भारताकडून रचले गेले हे विक्रम 

श्रीलंडेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये रोहित शर्माने फटकावलेले टी-२० क्रिकेटमधील संयुक्तरीत्या सर्वात वेगवान शतक आणि भारतीय संघाने रचलेली टी-२० क्रिकेटमधील संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकाची मोठी धावसंख्या याबरोबरच अनेक विक्रम शुक्रवारी रचले गेले. त्यांचा संक्षिप्त आढावा.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 10:03 PM2017-12-22T22:03:01+5:302017-12-22T22:03:21+5:30

whatsapp join usJoin us
Explode! The record has been set by India in Indoor T20 | रनस्फोट! इंदूर टी-२०मध्ये भारताकडून रचले गेले हे विक्रम 

रनस्फोट! इंदूर टी-२०मध्ये भारताकडून रचले गेले हे विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंदूर - श्रीलंडेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मासह इतर भारतीय फलंदाजांनी झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन केले. रोहित शर्माने फटकावलेले टी-२० क्रिकेटमधील संयुक्तरीत्या सर्वात वेगवान शतक आणि भारतीय संघाने रचलेली टी-२० क्रिकेटमधील संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकाची मोठी धावसंख्या याबरोबरच अनेक विक्रम शुक्रवारी रचले गेले. त्यांचा संक्षिप्त आढावा पुढील प्रमाणे. 

इंदूर टी-२० मध्ये भारतीय संघाने रचलेले विक्रम

- भारताने रचलेली ५ बाद २६० ही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी धावसंख्या. टी-२० क्रिकेटमधील एका डावातील सर्वाधिक धावांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध फटकावल्या होत्या ३ बाद २६३ धावा

- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात अडीचशे धावांचा टप्पा ओलांडणारा भारत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियानंतरचा तिसरा संघ.

 - या सामन्यात भारतीय संघाने एकूण २१ षटकार ठोकले.

रोहित शर्माने रचलेले विक्रम

- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील संयुक्तरित्या सर्वात वेगवान शतक

- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा फटकावणारा भारताचा कर्णधार

- रोहितच्या ११८ धावा ह्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताच्या फलंदाजाने एका डावाता फटकावलेल्या सर्वाधिक धावा

- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक १० षटकार ठोकणारा फलंदाज, याआधी एका डावात सर्वाधिक ७ षटकार युवराज सिंगने फटकावले होते. 

-२३ चेंडूत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या रोहितने पुढच्या ५० धावा अवघ्या १२ चेंडूत फटकावल्या
 
- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दोन शतके फटकावणारा रोहित शर्मा भारताचा पहिला फलंदाज  

-  आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दोन शतके फटकावणारा रोहित शर्मा जागतिक क्रिकेटमधील पाचवा फलंदाज, याआधी ख्रिस गेल, ब्रँडन मॅककलम, इव्हिन लुईस आणि कॉलिन मुनरो यांनी दोन शतके फटकावली होती. 
 

Web Title: Explode! The record has been set by India in Indoor T20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.