शास्त्र असतं ते... 'अंकशास्त्रा'नुसार यंदाचं IPL जेतेपद मुबंई इंडियन्सचंच होतं, जाणून घ्या कसं!

रोहित शर्माचे नेतृत्व कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीवर भारी पडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 12:22 PM2019-05-13T12:22:28+5:302019-05-13T12:23:07+5:30

whatsapp join usJoin us
Do you know why Mumbai Indians won IPL 2019 title, there is statistically logic behind MI title | शास्त्र असतं ते... 'अंकशास्त्रा'नुसार यंदाचं IPL जेतेपद मुबंई इंडियन्सचंच होतं, जाणून घ्या कसं!

शास्त्र असतं ते... 'अंकशास्त्रा'नुसार यंदाचं IPL जेतेपद मुबंई इंडियन्सचंच होतं, जाणून घ्या कसं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल 2019 : रोहित शर्माचे नेतृत्व कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीवर भारी पडले. इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात मुंबई इंडियन्सने अवघ्या एका धावेने जेतेपदाला गवसणी घातली. या विजयाबरोबर आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा मान रोहितने पटकावला. कर्णधार म्हणून त्यानं आयपीएलची चार जेतेपद पटकावलेली आहेत आणि खेळाडू म्हणून त्याचे हे पाचवे जेतेपद आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी अखेरपर्यंत झुंज देण्याची वृत्ती ठेवल्याने हे यश मिळवू शकते. शिवाय अंक शास्त्राचीही त्यांना साथ होतीच. अंकशास्त्रानुसार यदाचे जेतेपद हे मुंबई इंडियन्सनेच होते, जाणून घेऊया कसे.


रोहितला आयपीएलच्या अंतिम सामन्यात एकदाही पराभव पत्करावा लागलेला नाही आणि असा विक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे. रोहितने डेक्कन चार्जर्सकडून 2009 मध्ये आयपीएलचा चषक उंचावला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सकडून त्यानं ( 2013, 2015, 2017 व 2019 ) चार जेतेपदं जिंकली. जेतेपदांच्या सालावर लक्ष दिल्यास लक्षात येईल की एक वर्षाच्या गॅपनंतर मुंबईने बाजी मारली आहे. त्यामुळे यंदाही त्यांचेच नाणं खणखणीत वाजेल यात कुणालाही शंका नव्हती. रोहितनं कालच्या जेतेपदानंतर महेंद्रसिंग धोनीशी आणखी एका बाबतीत बरोबरी केली. धोनीनं अविवाहीत, पती आणि बाप अशा तीनही भूमिकेत असताना आयपीएल चषक उंचावला, रोहितनेही हीच कामगिरी करून दाखवली. 




 

मुंबई इंडियन्से 2017 मध्ये हैदराबाद येथेच अवघ्या 1 धावेने हार मानण्यास भाग पाडले होते आणि 2019 मध्ये त्यांनी चेन्नईवरही एका धावेने विजय मिळवला. यापूर्वी  मुंबईने जिंकलेल्या तीनही जेतेपदाच्यावेळी ऑरेंज कॅप पटकावणारा खेळाडू हा ऑस्ट्रेलियाचाच राहिला आहे. पण, 2013 आणि 2015 मध्ये डेव्हिड वॉर्नर आणि मुंबई इंडियन्स हे समीकरण जुळले आहे. त्यामुळे याच निकषावर मुंबईने यंदाही जेतेपदाचा चषक उंचावला. वॉर्नरने 2015 मध्ये 14 सामन्यां 7 अर्धशतकांसह 562 धावा, तर 2017 मध्ये 14 सामन्यांत 4 अर्धशतकं व 1 शतकासह 641 धावा करत ऑरेंज कॅप नावावर केली होती. यंदाही ऑरेंज कॅप ही वॉर्नरलाच मिळणार आहे. त्याने 12 सामन्यांत 8 अर्धशतकं व 1 शतकासह 692 धावा चोपल्या आहेत. त्याच्या जवळपासही कुणी नाही. त्यामुळे 2013 व 2015 प्रमाणे वॉर्नर यंदाही मुंबई इंडियन्ससाठी 'लकी बॉय' ठरला. 

( IPL 2019 : डेव्हिड वॉर्नर मुंबई इंडियन्सचा 'लकी बॉय', जाणून घ्या कसा! )

या व्यतिरिक्त मुंबईने आयपीएलच्या ज्या हंगामात 110 पेक्षा अधिक षटकार खेचले, त्यात त्यांनी बाजी मारली आहे.  2019मध्ये त्यांच्या नावावर एकूण 115 षटकार जमा आहेत. अन्य तीन जेतेपदांचा विचार केल्यास त्यांनी 2017 मध्ये 117 षटकार, 2015 मध्ये 120 षटकार आणि 2013 मध्ये 117 षटकार खेचले आहेत.  



2013 आणि 2019च्या जेतेपदात आणखी एक साम्य म्हणजे या दोन्ही हंगामाच्या अंतिम सामन्यात किरॉन पोलार्ड हा मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.  

Web Title: Do you know why Mumbai Indians won IPL 2019 title, there is statistically logic behind MI title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.