...म्हणून तिस-या कसोटीत अचानक पार्थिवच्या जागी दिनेश कार्तिकने केली कीपिंग

अखेरच्या कसोटी सामन्यात नाट्यमय विजय, या सामन्यात आयसीसीच्या नव्या नियमाचा भारतीय संघाला चांगलाच फायदा झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 12:52 PM2018-01-28T12:52:30+5:302018-01-28T15:27:05+5:30

whatsapp join usJoin us
Dinesh Karthik Fills In For Parthiv Patel: India Benefit From New Rule | ...म्हणून तिस-या कसोटीत अचानक पार्थिवच्या जागी दिनेश कार्तिकने केली कीपिंग

...म्हणून तिस-या कसोटीत अचानक पार्थिवच्या जागी दिनेश कार्तिकने केली कीपिंग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वॉंडरर्स : भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधात तिस-या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात नाट्यमय विजय मिळवला.  अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने आफ्रिकेवर 63 धावांनी मात करत मालिकेचा शेवट गोड केला. तसंच विराट आणि संघाने आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकासह कसोटी चॅम्पियनशीप आपल्याकडेच कायम राखत दहा लाख डॉलर रकमेचे पारितोषिक पटकावले.

या सामन्यात आयसीसीच्या नव्या नियमाचा भारतीय संघाला चांगलाच फायदा झाला. राखीव खेळाडू क्षेत्ररक्षणाशिवाय यष्टीरक्षणही करू शकतात असा नवा नियम आयसीसीने बनवला आहे, पण यासाठी अंपायरची परवानगी घेणं आवश्यक आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून या नियमाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली. सामन्याच्या चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात भारतीय संघाला या नियमाचा फायदा झाला.

शेवटच्या सत्रात जखमी असल्यामुळे पार्थिव पटेल मैदानात उतरला नाही तर त्याच्याऐवजी राखीव खेळाडू दिनेश कार्तिकने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली. जानेवारी 2010 पासून एकही कसोटी सामना न खेळलेल्या कार्तिकने अखेरच्या सत्रात विकेटकिपिंग केली. 
पार्थिव पटेल वनडे आणि टी-20 टीमचा सदस्य नाहीये. पटेलच्या उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली असून त्याच्यावर आज एक्स-रे करण्यात येणार आहेत.  
  

Web Title: Dinesh Karthik Fills In For Parthiv Patel: India Benefit From New Rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.