अंध महिलांचा महाराष्ट्र क्रिकेट संघ जाहीर

राज्यस्तरीय अंध महिलांची क्रिकेट स्पर्धा आज  इस्लाम जिमखाना, मरीन लाईन्स, मुंबई येथे नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड महाराष्ट्राच्या संघात करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 04:17 PM2018-11-28T16:17:14+5:302018-11-28T16:17:48+5:30

whatsapp join usJoin us
Blind women's Maharashtra Cricket team announced | अंध महिलांचा महाराष्ट्र क्रिकेट संघ जाहीर

अंध महिलांचा महाराष्ट्र क्रिकेट संघ जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) सोनी पिक्चर नेटवर्क इंडिया  यांच्या सौजन्याने अंध महिलांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आज  इस्लाम जिमखाना, मरीन लाईन्स, मुंबई येथे नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड महाराष्ट्राच्या संघात करण्यात आली आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील सहा संघांनी खान्देश, मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भाग घेतला होता. डब्ल्यूबीसीसी (वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेट कौन्सिल) आणि  सीएबीआय (क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया) यांच्या नियमांतर्गत हे सामने खेळवले गेले. या सामन्याच्या केलल्या कामगिरीच्या आधारे अंध महिलांचा महाराष्ट्र क्रिकेट संघाची निवड करण्यात आली. या संघात निवड झालेल्या खेळाडूंची नाव पुढील प्रमाणे आहेत. 

भारतीय संघ पुढील प्रमाणे : ज्योती तुपे(मुंबई), नैना पाटणकर (मुंबई), दीपमाला (मुंबई), अंकिता भावने (विदर्भ), आरती आढव (पश्चिम महाराष्ट्र), सारिका बारुड (पश्चिम महाराष्ट्र), वर्षा भिसे (पश्चिम महाराष्ट्र), भारती भावसार (विदर्भ), अमृता सोमशे (खान्देश), अ अंकिता कांबळेकर (कोकण), चंद्रकला शिर्तोंडे (पश्चिम महाराष्ट्र), प्राजक्ता उंडे (विदर्भ), गंगा कदम (खान्देश), सविता गुंडेकर (मराठवाडा), अंचल (मुंबई).
या संघासाठी राखीव तीन खेळाडूही निवडण्यात आले आहेत. या राखीव खेळाडूंमध्ये अंकिता शिंदे (विदर्भ), आरती अतकरी (विदर्भ), व प्रवीण सयीद (मराठवाडा) यांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Blind women's Maharashtra Cricket team announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई