रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात वाचला; ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने कुटल्या १४८ चेंडूत २५७ धावा

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँड यांच्यातील लढतीत डी'आर्सी शॉर्ट याने लिस्ट A क्रिकेटमधील तिसरी सर्वोत्तम खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 02:36 PM2018-09-28T14:36:34+5:302018-09-28T14:38:28+5:30

whatsapp join usJoin us
Australian batsman D'Arcy Short slams 148-ball 257 runs, rohit sharma record still alive | रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात वाचला; ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने कुटल्या १४८ चेंडूत २५७ धावा

रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात वाचला; ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने कुटल्या १४८ चेंडूत २५७ धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी : ऑस्ट्रेलियातील जेएलटी वन डे सामन्यांत चौकार आणि षटकारांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँड यांच्यातील लढतीत डी'आर्सी शॉर्ट याने लिस्ट A क्रिकेटमधील तिसरी सर्वोत्तम खेळी साकारली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना त्याने १४८ चेंडूत २५७ धावा कुटल्या. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून द्विशतक करणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज आहे. त्याने १५ चौकार आणि २३ षटकारांची आतषबाजी केली. या खेळीसह त्याने भारताचा सलामीवीर शिखर धवन याचा विक्रम मोडला, तर रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात वाचला. 



लिस्ट A क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळीचा विक्रम इंग्लंडच्या ॲलिस्टर ब्राउनच्या नावावर आहे. त्याने २००२ मध्ये सरेचे प्रतिनिधित्व करताना ग्लॅमोर्गन क्लबविरुद्ध २६८ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताच्या रोहित शर्माचा क्रमांक येतो. 


लिस्ट A क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी ( ५० षटके) 
१ : ॲलिस्टर ब्राउन (२६८), सरे वि. ग्लॅमॉर्गन, ओव्हल २००२
२: रोहित शर्मा (२६४), भारत वि. श्रीलंका, कोलकाता २०१४
३: डी'आर्सी शॉर्ट (२५७) , वेस्टर्न ऑस्ट्रेलिया वि. क्वीन्सलँड, हर्स्टविल्ले २०१८
४ : शिखर धवन (२४८), भारत A वि. दक्षिण आफ्रिका A , प्रिटोरिया २०१३ 


शॉर्टने ८३ चेंडूत शतक पूर्व केले आणि त्यानंतर पुढील ४५ चेंडूत त्याने शंभर धावा जोडल्या. या खेळीत त्याने २३ षटकार खेचले आणि न्यूझीलंडच्या कॉलीन मुनरो ??? नंतर वन डे सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम त्याने नावावर केला. ऑस्ट्रेलियाच्या बेन डंक, फिलिप ह्युजेस आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या नावावर या क्लबकडून द्विशतक जमा आहेत.

Web Title: Australian batsman D'Arcy Short slams 148-ball 257 runs, rohit sharma record still alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.