टी-20 च्या मैदानात आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने नोंदवला विश्वविक्रम

ऑस्ट्रेलियन संघाने टी-20 क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 05:16 PM2018-02-16T17:16:26+5:302018-02-16T18:59:49+5:30

whatsapp join usJoin us
Australia made a unique record in the T20 field | टी-20 च्या मैदानात आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने नोंदवला विश्वविक्रम

टी-20 च्या मैदानात आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने नोंदवला विश्वविक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑकलंड  - ऑस्ट्रेलियन संघाने टी-20 क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत न्यूझीलंडने दिलेल्या 244 धावांच्या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने हा विक्रम नोंदवला आहे. आज न्यूझीलंडविरुद्ध 244 धावांच्या आव्हानाचा यशस्वीरीत्या पाठलाग केल्यानंतर ऑस्ट्रलियन संघ टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारा संघ ठरला आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावे होता. 
ऑकलंड येथील इडन पार्क येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यानंतर मार्टिन गप्टिलचे (105) शतक आणि कॉलिन मुनरोच्या 76 धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 244 धावंचे आव्हान ठेवले. 
या आल्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून आर्की शॉर्टने सर्वाधिक 76 तर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 59 धावा फटकावल्या. त्याबरोबरच ऑस्ट्रेलियन संघ टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारा संघ ठरला आहे. याआधी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावे होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरोधात  236 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. 
 

Web Title: Australia made a unique record in the T20 field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.