Asia Cup 2018 : घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आल्या आणि भारत-पाकिस्तानचे कर्णधार हसायला लागले

या पत्रकार परिषदेमध्ये एका खेळाडूच्या घरातील गोष्टींची चर्चा सुरु होती. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपले हसू आवरता आले नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 05:30 PM2018-09-17T17:30:49+5:302018-09-17T17:31:44+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2018: The things happened in the house and India-Pakistan captain laughed | Asia Cup 2018 : घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आल्या आणि भारत-पाकिस्तानचे कर्णधार हसायला लागले

Asia Cup 2018 : घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आल्या आणि भारत-पाकिस्तानचे कर्णधार हसायला लागले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे... ही गोष्ट सांगत असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद यांनी हसू आवरता आले नाही.

दुबई, आशिया चषक 2018 : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पण या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सर्व देशांच्या कर्णधारांची एक पत्रकार परिषद झाली होती. या पत्रकार परिषदेमध्ये एका खेळाडूच्या घरातील गोष्टींची चर्चा सुरु होती. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपले हसू आवरता आले नाही. 


पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी बांगलादेश, पाकिस्तान आणि भारताच्या कर्णधारांमध्ये गप्पा रंगल्या होत्या. यामध्ये बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुर्तझा आपल्या संघातील बंदी घेतलेल्या मोसादेक हुसेन या खेळाडूबद्दल बोलत होता. मोसादेकवर पत्नीने गंभीर आरोप केल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही गोष्ट सांगत असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद यांनी हसू आवरता आले नाही.

Web Title: Asia Cup 2018: The things happened in the house and India-Pakistan captain laughed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.