यंदा नेतृत्वाबाबत अश्विनची धोनीशी बरोबरी

आयपीएलच्या यंदाच्या सत्रात किंग्स इलेव्हन पंजाब संघ शांत चित्ताने यशाचा मार्ग सुकर करीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:30 AM2019-04-18T04:30:34+5:302019-04-18T04:30:58+5:30

whatsapp join usJoin us
Ashwin is equal to Dhoni's leadership this year | यंदा नेतृत्वाबाबत अश्विनची धोनीशी बरोबरी

यंदा नेतृत्वाबाबत अश्विनची धोनीशी बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- हर्षा भोगले लिहितात...
आयपीएलच्या यंदाच्या सत्रात किंग्स इलेव्हन पंजाब संघ शांत चित्ताने यशाचा मार्ग सुकर करीत आहे. स्पर्धा सुरू होण्याआधी या संघाकडून खूप काही अपेक्षा व्यक्त झाल्या नव्हत्या. संघ बांधणीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि ते योग्यही होतेच.
पंजाब प्ले आॅफमध्ये स्थान मिळवेल की नाही, हे कुणीही हमखास सांगू शकणार नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्ध १८२ धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजांकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीची गरज होती. पण गोलंदाजी तितकी धोकादायक वाटत नव्हती. मोहम्मद शमी लयमध्ये असला तरी टी२० त त्याची आकडेवारी साधारण अशी आहे. पांढऱ्या चेंडूच्या सामन्यात रविचंद्रन अश्विनच्या नावावर विचार कमी होतो. पण अश्विन अनेक लेगस्पिनरपैकी एक नाव आहे. अर्शदीपसिंग याचे नाव अनेकांना कमी माहिती असावे. अफगाणिस्तानचा युवा खेळाडू मुजीबसाठी यंदाचे सत्र विशेष ठरलेले नाही. तरी देखील काही अपवाद वगळता पंजाबच्या गोलंदाजांनी राजस्थानला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही.
पंजाब संघ सामन्यागणिक कसा यशस्वी होत आहे. तुम्ही ख्रिस गेलची खेळी पाहू शकता किंवा लोकेश राहुलच्या नव्या भूमिकेवर नजर टाकू शकता. तो खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी सुरुवातीला अधिक चेंडू खेळतो. मयांक अग्रवाल निमूटपणे स्वत:च्या भूमिकेला न्याय देत आहे. पण याच गोष्टी तुम्हाला प्ले आॅफचा मार्ग मोकळा करून देऊ शकत नाहीत. संघाच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे, कर्णधार अश्विन...
यंदाच्या सत्रात नेतृत्वाबाबत तो महेंद्रसिंग धोनीच्या पंक्तीत बसला आहे. तुम्ही संघांवर नजर टाका. लीडर कोण, हे सहज लक्षात येईल.अश्विन निर्णय क्षमतेत मागे सरताना दिसत नाही. स्वत:चा निर्णय घेत तो प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या डोळ्यात डोळे टाकून आनंद साजरा करतो. शिवाय तो एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून यशस्वी ठरला आहे. पंजाबला प्ले आॅफमध्ये स्थान पटकविण्यात यश आले तर अश्विनसाठी ही बाब जेतेपद मिळविल्यासारखीच ठरेल.

Web Title: Ashwin is equal to Dhoni's leadership this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.