...तर आॅस्ट्रेलियन फलंदाजी ढेपाळते

मेघालयातील हिरवेगार पहाड बघितल्यानंतर आणि गुवाहाटीला पोहोचण्यासाठी आणखी खाली उतरावे लागणार असल्यामुळे मन प्रसन्न होते. फिक्कट निळ्या पडद्यामागून पांढºया रंगाचे ढग बघितल्यानंतर तुमच्या ओठांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 01:33 AM2017-10-10T01:33:00+5:302017-10-10T01:33:20+5:30

whatsapp join usJoin us
 ... and then bowl Australian batting | ...तर आॅस्ट्रेलियन फलंदाजी ढेपाळते

...तर आॅस्ट्रेलियन फलंदाजी ढेपाळते

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हर्षा भोगले लिहितात...
मेघालयातील हिरवेगार पहाड बघितल्यानंतर आणि गुवाहाटीला पोहोचण्यासाठी आणखी खाली उतरावे लागणार असल्यामुळे मन प्रसन्न होते. फिक्कट निळ्या पडद्यामागून पांढºया रंगाचे ढग बघितल्यानंतर तुमच्या ओठांवर अलगद गीत उमटते. आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटूही आमच्याच विमानात होते. मला वाटतं त्यांच्याही चेहºयावर हसू होतं. त्यांची मधली फळी अधिक मजबूत झाली आहे.
या छोटेखानी मालिकेतून भारताला मात्र एक बाब गवसली आहे. जर तुम्ही वॉर्नर व फिंच यांना झटपट माघारी परतवण्यात यशस्वी ठरले तर आॅस्ट्रेलियाच्या उर्वरित फलंदाजीचा शिळ्या ब्रेडप्रमाणे भुगा पडतो. आॅस्ट्रेलियन फलंदाज भारताच्या युवा गोलंदाजांच्या माºयाला समर्थपणे तोंड देण्यास अपयशी ठरत असल्याचे बघून आश्चर्य वाटते. मात्र त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते मात्र खूश आहेत.
भुवनेश्वर कुमार जसप्रीत बुमराहच्या साथीने गोलंदाजीच्या आक्रमणाची धुरा सांभाळत आहे. रांचीमध्ये या गोलंदाजांनी सुरुवातीला काही धावा बहाल केल्या असल्या तरी फलंदाजांना विचार करण्यास भाग पाडत कर्णधार कोहलीला आम्ही पुनरागमन करण्यास सक्षम असल्याचा विश्वास प्रदान केला.
दोन युवा फिरकीपटू रॉक स्टार्स आहेत. मनगटाच्या जोरावर चेंडू वळवण्याची मोठी परंपरा असलेल्या देशात चहल व कुलदीप यादव सातत्याने मधल्या फळीवर वर्चस्व गाजवत आहेत. मनगटाच्या जोरावर चेंडू वळविणाºया फिरकीपटूंविरुद्ध खेळताना अडचण जाते, पण तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण सध्याच्या घडीला तसा विचार करणे म्हणजे या दोन दर्जेदार गोलंदाजांवर अन्याय केल्यासारखे होईल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या गेल्या काही महिन्यांतील उंचावलेल्या कामगिरीमध्ये या दोन गोलंदाजांचा वाट मोलाचा आहे.
गुवाहाटीमध्येही आॅस्ट्रेलियन फलंदाज व या गोलंदाजांदरम्यान लढत अनुभवायला मिळेल. आॅस्ट्रेलियन फलंदाजांनी या फिरकीपटूंविरुद्ध खेळण्याचे कौशल्य आत्मसात करायला हवे. त्यांनी तशी तयारी केली असावी. यादव व चहल कशी गोलंदाजी करतात, याबाबत उत्सुकता आहे. भारताच्या या भागात नव्याने बांधलेल्या स्टेडियममध्ये खेळल्या जाणाºया पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पावसाचा व्यत्यय निर्माण होणार नाही, अशी आशा आहे. (पीएमजी)

Web Title:  ... and then bowl Australian batting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.