भारताविरुद्धच्या लढतीसाठी अफगाणिस्तान संघ जाहीर

जगातील अव्वल टी-२० गोलंदाज राशिद खान १४ जूनपासून बेंगळुरूमध्ये भारताविरुद्ध प्रारंभ होणाऱ्या ऐतिहासिक एकमेव कसोटी सामन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:00 AM2018-05-30T05:00:10+5:302018-05-30T05:00:10+5:30

whatsapp join usJoin us
Afghanistan squad for the match against India | भारताविरुद्धच्या लढतीसाठी अफगाणिस्तान संघ जाहीर

भारताविरुद्धच्या लढतीसाठी अफगाणिस्तान संघ जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : जगातील अव्वल टी-२० गोलंदाज राशिद खान १४ जूनपासून बेंगळुरूमध्ये भारताविरुद्ध प्रारंभ होणाऱ्या ऐतिहासिक एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानच्या १५ सदस्यांच्या संघ फिरकीचे नेतृत्व करणार आहे.
आयपीएलमध्ये सनसनाटी निर्माण करणारा राशिद आणि युवा मजिब-उर-रहमान यांच्या व्यतिरिक्त अन्य फिरकीपटू चायनामन झहीर खान आणि आमिर हमजा होटक यांना असगर स्टॅनिकजईच्या नेतृत्वाखालील संघात स्थान मिळाले आहे.
राशिद व मुजिबने टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या प्रतिभेने जगाला प्रभावित केले आहे, पण या दोघांना कसोटीमध्ये वेगळ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
या दोघांपैकी राशिदने चार प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, तर मुजिबला अद्याप अनुभव नाही. फलंदाजीची जबाबदारी कर्णधार स्टॅनिकजई, सलामीवीर मोहम्मद शहजाद आणि अष्टपैलू मोहम्मद नबी यांच्यावर राहील. संघातील खेळाडूंचा अनुभव एकूण २०५ प्रथम श्रेणी सामन्यांचा आहे. केवळ चार खेळाडूंनी २० पेक्षा अधिक प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. नबी आयपीएलच्या दोन सत्रांमध्ये सनरायझर्स हैदराबादतर्फे खेळलेला आहे. त्याने सर्वाधिक ३२ प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत.
अफगाणिस्तानला त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज दौलत जादरानची उणीव भासेल. दुखापतग्रस्त असल्यामुळे तो संघाबाहेर आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी यामिन अहमदजई वफादार व सय्यद अहमद शिरजाद यांच्यावर राहील.
सर्वांची नजर राशिदवर राहील. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने राशिद जगातील सर्वोत्तम टी-२० गोलंदाज असल्याचे म्हटले आहे.
भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, ‘तो चांगली कामगिरी करीत आहे. विशेषत: टी-२० क्रिकेटमध्ये. त्याने सनरायझर्सतर्फे शानदार कामगिरी केली आहे. तो चांगला गोलंदाज आहे, हे मान्य करावेच लागेल. अफगाणिस्तानला कमी लेखता येणार नाही. कारण क्रिकेट किंवा जीवनातही आपण कुठल्याही बाबीला कमी लेखू शकत नाही. (वृत्तसंस्था)

अफगाणिस्तान संघ
असगर स्टॅनिकजई, मोहम्मद शहजाद, जावेद अहमदी, रहमत शाह, इहसानुल्लाह जनत, नासिर जमाल, हशमतुल्लाह शाहिदी, अफसर जाजाई, मोहम्मद नबी, राशिद खान, झहीर खान, आमिर हमजा होटक, सैयद अहमद शिरजाद, यामिन अहमदजाई वफादार आणि मुजिब-उर-रहमान.

Web Title: Afghanistan squad for the match against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.