ठळक मुद्देया विजयासह बँगलोरचे 10 गुण झाले असून ते सातव्याच स्थानी आहेत.

बँगलोरचा पंजाबवर दणदणीत विजय

इंदूर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर दहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. बँगलोरच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत पंजाबचा डाव अवघ्या 88 धावांत संपुष्टात आणला. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरने एकही फलंदाज गमावला नाही. बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने 28 चेंडूंत 6 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 48 धावा केल्या, तर पार्थिव पटेलने 22 चेंडूंत सात चौकारांत्या मदतीने नाबाद 40 धावांची खेळी साकारली. या विजयासह बँगलोरचे 10 गुण झाले असून ते सातव्याच स्थानी आहेत.

10.22 PM : बँगलोरचा पंजाबवर दहा विकेट्स आणि 71 चेंडू राखून विजय

10.08 PM : बँगलोर पाच षटकांत बिनबाद 54

9.55 PM : कोहलीला 18 धावांवर असताना जीवदान

- बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीला आरोन फिंचने झेल सोडल्यामुळए जीवदान मिळाले, त्यावेळी कोहली 18 धावांवर होता.

9.50 PM : कोहलीच्या कर्णधारपदावर असताना 3500 धावा पूर्ण

- आयपीएलमध्ये बँगलोरचे कर्णधारपद भूषवताना कोहलीने पंजाबविरुद्धच्या सामन्यातील तिसऱ्या षटकात 3500 धावा पूर्ण केल्या.

बँगलोरची भेदक गोलंदाजी; पंजाब सर्वबाद 88

इंदूर : भेदक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबचा फक्त 88 धावांत खुर्दा उडवला. यंदाच्या हंगामातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी पंजाबसाठी चांगली सुरुवात केली होती. पण उमेश यादवने पाचव्या षटकात या दोघांना बाद करत पंजाबला पिछाडीवर ढकलले. उमेशने या सामन्यात तीन बळी मिळवत पंजाबचे कंबरडे मोडले. पंजाबच्या आठ फलंदाजांना यावेळी दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही.

9.20 pm : पंजाबचा 88 धावांत खुर्दा

9.11 PM : पंजाबला नववा धक्का; मोहित शर्मा बाद

- मोहित शर्माने धावचीत होत आपल्या पायावरच धोंडा मारून घेतला. मोहितला फक्त तीनच धावा करता आल्या.

9.04 ंPM : पंजाबला आठवा धक्का; अॅँड्र्यू टाय बाद

- बँगलोरचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने अॅँड्र्यू टायला बाद करत पंजाबला आठवा धक्का दिला.

9.00 PM : पंजाबचा कर्णधार अश्विन धावचीत, पंजाबला सातवा धक्का

- पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने धावचीत होत आत्मघात केला. पंजाबसाठी हा सातवा धक्का होता.

8.58 PM : पंजाबला सहावा धक्का; आरोन फिंच बाद

- बँगलोरसाठी धोकादायक ठरत असलेल्या आरोन फिंचला मोईन अलीने कोहलीकरवी बाद केले. पंजाबसाठी हा सहावा धक्का होता. फिंचने 23 चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांसह 26 धावा केल्या.

8.43 PM : पंजाबचा अर्धा संघ तंबूत... मयांक अगरवाल बाद. पंजाब नवव्या षटकात 5 बाद 61

- कॉलिन डी ग्रँडहोमने मयांक अगरवालला बाद करत पंजाबला पाचवा धक्का दिला. त्यामुळे पंजाबची नवव्या षटकात 5 बाद 61 अशी स्थिती होती.

युवराज आणि नेहरा यांनी सामन्यापूर्वी भेटल्यावर कसा डान्स केला तो व्हीडीओ पाहा... 

8.31 PM : पंजाबला चौथा धक्का; मार्कस स्टोईनिस OUT

- युजवेंद्र चहलने मार्कस स्टोईनिसला त्रिफळाचीत करत पंजाबला चौथा धक्का दिला. मार्कस दोन धावाच करता आल्या.

गेलला बाद केल्यावर कोहलीने कसा आनंद साजरा केला ते पाहा 

8.24 PM : करुण नायर OUT; पंजाबला तिसरा धक्का

- सहाव्या षटकात मोहम्मद सिराजने करुण नायरला कोहलीकरवी झेलबाद केले. पंजाबसाठी हा तिसरा धक्का होता. करुणला फक्त एकच धाव करता आली.

8.22 PM : ख्रिस गेल OUT; पंजाबला पाचव्या षटकातच दुसरा धक्का

- पाचव्या षटकात उमेश यादवने लोकेश राहुलला बाद करत पहिला धक्का दिला. पण या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर गेलला बाद करत पंजाबला एकाच षटका उमेशने दोन धक्के दिले. गेलने चार चौकारांच्या जोरावर 18 धावा केल्या.

8.18 PM : पंजाबला पहिला धक्का; लोकेश राहुल OUT

- पाचव्या षटकात उमेश यादवने लोकेश राहुलला बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. राहुलने तीन षटकारांच्या जोरावर 21 धावा केल्या.

8.12 PM : ख्रिस गेलचा खणखणीत चौकार

- सावधपणे खेळणाऱ्या गेलने टीम साऊथीच्या चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार वसूल केला.

8.01 PM : ख्रिस गेलला शून्यावर असताना जीवदान

- उमेश यादवच्या पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर पार्थिव पटेलने ख्रिस गेलचा झेल सोडला. यावेळी गेलला खातेही उघडता आले नव्हते.

गेलचा हा डान्स पाहून व्हाल चकित... पाहा हा व्हीडीओ 

7.30 PM : बंगळुरुने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. 

बंगळुरुसाठी करो या मरो; आज पंजाबशी करणार दोन हात

इंदूर : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी आज होणार किंग्ज इलेव्हन पंजाबसाठीचा सामना करो या मरो, असाच असणार आहे. कारण हा सामना गमावल्यावर बँगलोरचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्याचबरोबर या सामन्यात ख्रिस गेल आणि बँगलोरचा संघ यांच्यामध्ये द्वंद्वं पाहायला मिळणार आहे. कारण या हंगामात बँगलोरच्या संघाने गेलला आपल्या ताफ्तात सामील करून न घेता वाऱ्यावर सोडले होते. त्यामुळे बँगलोजविरुद्धच्या सामन्यात गेल कसा खेळतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

 

दोन्ही संघ  


Web Title: KXIPvRCB, IPL 2018 LIVE: Gayle's dancing look will be astonishing ... see this video
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.