KXIP vs SH, IPL2018 : भेदक गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादचा पंजाबवर विजय

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 133 धावांचे आव्हान ठेवले होते. ट्वेन्टी-20 क्रिकेटचा विचार करता हे आव्हान माफक होते. पण हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि संघाला 13 धावांनी विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 07:50 PM2018-04-26T19:50:46+5:302018-04-26T23:50:05+5:30

whatsapp join usJoin us
KXIP vs SH, IPL2018 LIVE: Chris Gayle will play today, expect aggressive batting by fans | KXIP vs SH, IPL2018 : भेदक गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादचा पंजाबवर विजय

KXIP vs SH, IPL2018 : भेदक गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादचा पंजाबवर विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देफिरकीपटू रशिद खानने यावेळी चार षटकांत 19 धावा देत तीन फलंदाजांना बाद केले.

भेदक गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादचा पंजाबवर विजय

हैदराबाद : पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादने विजय साकारला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 133 धावांचे आव्हान ठेवले होते. ट्वेन्टी-20 क्रिकेटचा विचार करता हे आव्हान माफक होते. पण हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि संघाला 13 धावांनी विजय मिळवून दिला. हैदराबादच्या तिखट माऱ्यापुढे पंजाबचा डाव 119 धावांवरच आटोपला. फिरकीपटू रशिद खानने यावेळी चार षटकांत 19 धावा देत तीन फलंदाजांना बाद केले, तर संदीप सिंग, शकिब अल हसन आणि बासिल थम्पी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत हैदराबादच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

 



 

11.33 PM : हैदराबादचा पंजाबवर 13 धावांनी विजय

11.32 PM : पंजाबला विजयासाठी 5 चेंडूंत 14 धावांची गरज

11.30 PM : पंजाबला विजयासाठी 6 चेंडूंत 15 धावांची गरज

11.25 PM : पंजाबला विजयासाठी 12 चेंडूंत 23 धावांची गरज

11.18 PM : पंजाबला आठवा धक्का; बरिंदर सरण बाद

11.10 PM :  पंजाबला सातवा धक्का; अॅण्ड्र्यू टाय बाद

- संदीप शर्माने सोळाव्या षटकात अॅण्ड्र्यू टायला पायचीत पकडत पंजाबला सातवा धक्का दिला.

11.04 PM : पंजाबला सहावा धक्का; मनोज तिवारी बाद

- संदीप शर्माने सोळाव्या षटकात मनोज तिवारीला केन विल्यम्सनकरवी झेलबाद केले, पंजाबसाठी हा सहावा धक्का होता.

10.58 PM : पंजाबला पाचवा धक्का; आरोन फिंच बाद

- शकिब अल हसनने पंधराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फिंचला बाद करत पंजाबला पाचवा धक्का दिला.

10.54 PM : पंजाबला चौथा धक्का; करुण नायर बाद

- रशिद खानने करुण नायरला पायचीत पकडत पंजाबला चौथा धक्का दिला.

10.48 PM : पंजाबला तिसरा धक्का; मयांक अगरवाल बाद

- शकिब अल हसनने तेराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मयांकला बाद केले आणि पंजाबला तिसरा धक्का दिला.

10.40 PM : पंजाब 10 षटकांत 2 बाद 67

10.31 PM : पंजाबला हादरा, ख्रिस गेल बाद

- हैदराबादचा वेगवान गोलंदाज बासिल थम्पीने आपल्याच गोलंदाजीवर गेलचा झेल घेत पंजाबला मोठा धक्का दिला. गेलने 22 चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 23 धावा केल्या.

10.25 PM : लोकेश राहुल बाद; पंजाबला पहिला धक्का

- रशिद खानने आठव्या षटकात लोकेश राहुलला बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. राहुलने 26 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 32 धावा केल्या.

10.10 PM :  पंजाब पाच षटकांत बिनबाद 35

10.02 PM : लोकेश राहुलची दमदार फटकेबाजी; तिसऱ्या षटकात 16 धावांची बरसात

- मोहम्मद नबीच्या चौथ्या षटकात दोन चौकार आणि एका षटकारासह 16 धावा फटकावल्या.

9.50 PM : ख्रिस गेलने षटकाराने उघडले आपले खाते

- गेलने मोहम्मद नबीच्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दमदार षटकार लगावत आपले खाते झोकात उघडले.

हैदराबादची फलंदाजी पुन्हा ढेपाळली, पंजाबविरुद्ध 132 धावा

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबाच्या फलंदाजांकडून पुन्हा एकदा हाराकिरी पाहायला मिळाली. या गोष्टीला अपवाद ठरला तो मनीष पांडे. मनीषने 54 धावांची खेळी साकारल्यामुळे हैदराबादला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात 132 धावा करता आल्या. पंजाबचा वेगवान गोलंदाज अंकित राजपूतने यावेळी तिखट मारा करत हैदराबादच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम चोख बजावले. अंकितने चार षटकांमध्ये फक्त 14 धावा देत हैदराबादच्या पाच फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडे मोडले.

9.31 PM : पंजाबच्या अंकित राजपूतचे 14 धावांत 5 बळी

- अंकित राजपूतने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात भेदक मारा केला. त्याने चार षटकांमध्ये फक्त 14 धावा देत हैदराबादचा अर्धा संघ तंबूत धाडला.

9.31 PM : हैदराबादचे पंजाबपुढे 133 धावांचे आव्हान

9.28 PM : मनीष पांडे बाद, हैदराबादला पाचवा धक्का

- अखेरच्या षटका अंकित राजपूतने  मनीष पांडेला त्रिफळाचीत करत हैदराबादला पाचवा धक्का दिला.  मनीषने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 54 धावांची खेळी साकारली.

9.22 PM : चौकारासह मनीष पांडेचे अर्धशतक

- मनीषने 19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कव्हर्समध्ये चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले.

9.16 PM : मनीष पांडेला 46 धावांवर जीवदान

- मनीष पांडेला 17 व्या षटकात 46 धावांवर जीवदान मिळाले. अॅण्ड्रयू टायच्या गोलंदाजीवर मयांक अगरवालने पांडेला झेल सोडला.

9.12 PM  :  हैदराबादचे सतराव्या षटकात शतक पूर्ण

9.07 PM : हैदराबाद 15 षटकांत 4 बाद 97

9.03 PM : शकिब अल हसन बाद; हैदराबादला चौथा धक्का

- मुजीब उर रेहमानने शकिबला बाद करत हैदराबादला चौथा धक्का दिला. शकिबने तीन चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या.

9.00 PM : तिसऱ्या विकेटसाठी शकिब आणि मनीष यांची अर्धशतकी भागीदारी

8.45 PM : हैदराबाद दहा षटकांत 3 बाद 57

- मनीष पांडे आणि शकिब अल हसन यांनी हैदराबादचा डाव सारवला आणि संघाला 10 षटकांत 57 धावांपर्यंत मजल मारून दिली.

8.38 PM : आठ षटकांत हैदराबादचे अर्धशतक पूर्ण

8.27 PM : शकिब अल हसनला शून्यावर जीवदान

- शकिब पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता, पण बरींदर सरणचा हा चेंडू पंचांनी नो बॉल ठरवला आणि शकिबला जीवदान मिळाले.

8.23 PM : वृद्धिमान साहा OUT; हैदराबादला तिसरा धक्का

- अंकित राजपूतने पाचव्या षटकात वृद्धिमान साहाला बाद करत हैदराबादला तिसरा धक्का दिला.

8.12 PM : शिखर धवन OUT; हैदराबादला दुसरा धक्का

- अंकित राजपूतने तिसऱ्या षटकात शिखर धवनला बाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. धवनने आठ चेंडूंत 2 चौकारांच्या जोरावर 11 धावा केल्या.

8.08 PM : शिखर धवनचा हैदराबादसाठी पहिला चौकार

- सलामीवीर शिखर धवनने बरिंदर सरणच्या दुसऱ्या षटकात हैदराबादसाठी पहिला चौकार वसूल केला.

8.03 PM : हैदराबादला पहिला धक्का; कर्णधार केन विल्यम्सन बाद

- पंजाबचा वेगवान गोलंदाज अंकित राजपूतने हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनला चौथ्याच चेंडूवर बाद केले. विल्यम्सनला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.

8.02 PM :  पहिल्याच चेंडूवर पंजाबचा फिरकीपटू मुजीब जायबंदी

7.35 PM : ख्रिस गेल आज खेळणार, धडाकेबाज फलंदाजीची चाहत्यांची अपेक्षा

7.30 PM :  पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय



 

अव्वल स्थानासाठी पंजाब आणि हैदराबादमध्ये चुरस

हैदराबाद : किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी आतापर्यंत दमदार कामिगरी केली आहे. पंजाब सध्याच्या घडीला दुसऱ्या तर हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे. गुरुवारी या दोन्ही संघांमध्ये गुरुवारी सामना रंगणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्यांना अव्वल स्थानावर पोहोचण्याची नामी संधी असेल. त्यामुळे या सामन्यात पंजाब आणि हैदराबाद यांच्यामध्ये अव्वल स्थानावर पोहोचण्याची चुरस असेल. पंजाबचा संघ या सामन्यात ख्रिस गेलला खेळवतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. कारण गेल फॉर्मात असला तरी त्याला गेल्या सामन्यात पंजाबने खेळवले नव्हते. दुसरीकडे हैदराबादचा संघ चांगली कामिगरी करत आहे. गेल्या सामन्यात त्यांनी मुंबई इंडियन्सला 87 धावांवर सर्वबाद केले होते. गोलंदाजी हे हैदराबादचे बलस्थान ठरत आहे. त्यामुळे या सामन्यात हैदराबादची गोलंदाजी आणि गेल यांच्यातलं युद्ध पाहायला मिळावं, अशी आशा चाहत्यांना असेल. 

 

दोन्ही संघ



 



 

Web Title: KXIP vs SH, IPL2018 LIVE: Chris Gayle will play today, expect aggressive batting by fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.