IPL 2018 : धवनची धडाकेबाज फलंदाजी; हैदराबादचा राजस्थानवर 9 विकेट्स राखून सहज विजय

धवनने 57 चेंडूंत 13 चौकार एका षटकाराच्या जोरावर नाबाद 77 धावा केल्या. हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने धवनला चांगली साथ दिली, त्याने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 36 धावा केल्या. धवन आणि विल्यम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 08:08 PM2018-04-09T20:08:53+5:302018-04-09T23:16:18+5:30

whatsapp join usJoin us
KXIP vs DD, IPL 2018: Sunrisers' decision to win toss | IPL 2018 : धवनची धडाकेबाज फलंदाजी; हैदराबादचा राजस्थानवर 9 विकेट्स राखून सहज विजय

IPL 2018 : धवनची धडाकेबाज फलंदाजी; हैदराबादचा राजस्थानवर 9 विकेट्स राखून सहज विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देधवल कुलकर्णीच्या पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणेने स्लीपमध्ये धवनचा सोपा झेल सोडला, त्यावेळी धवनने भोपळाही फोडला नव्हता.

हैदराबाद : शून्यावर जीवदान मिळालेला सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर शिखन धवनने नाबाद 77 धावांची तडफदार खेळी साकारत संघाला आपल्या आयपीएलच्या पहिल्याच लढतीत सहज विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सला 125 धावाच करता आल्या. हैदराबादने 9 विकेट्स राखत या आव्हानाचा सहजपणे पाठलाग केला.

धवल कुलकर्णीच्या पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणेने स्लीपमध्ये धवनचा सोपा झेल सोडला, त्यावेळी धवनने भोपळाही फोडला नव्हता. दुसऱ्या षटकात जयदेव उनाडकटने वृद्धिमान साहाला स्वस्तात बाद केले, पण त्यानंतर मात्र राजस्थानला एकही यश मिळवता आले नाही. धवनने राजस्थानच्या गोलंदाजीची पिसे काढली. धवनने 57 चेंडूंत 13 चौकार एका षटकाराच्या जोरावर नाबाद 77 धावा केल्या. हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने धवनला चांगली साथ दिली, त्याने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 36 धावा केल्या. धवन आणि विल्यम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्यापूर्वी, नाणेफेक जिंकत हैदराबादने राजस्थानला फलंदाजीसाठी पाचारण केले. राजस्थानला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. पण त्यानंतर संजू सॅमसनने आक्रमकपणे खेळ करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कर्णधार अजिंक्य रहाणे (13) आणि धडाकेबाज फलंदाज बेन स्टोक्स यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, पण सॅमसन मात्र एका बाजूने धावफलक हलता ठेवण्याचे काम चोख बजावत होता. त्याच्या फलंदाजीमुळेच राजस्थानला दहा षटकांमध्ये 71 धावा करता आल्या.

सॅमसनला अन्य फलंदाजांकडून चांगली साथ मिळत नव्हती. त्यामुळे धावसंख्या वाढवण्याच्या नादात तो बाद झाला. सॅमसनचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले. सॅमसनने पाच चौकारांच्या जोरावर 49 धावांची खेळी साकारली. सामन्याच्या 14व्या षटकात राजस्थानला दोन धक्के दिले ते शकिब अल हसनने. 14व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने राहुलला बाद केले, तर याच षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने हैदराबादच्या मार्गातील सॅमसनचा काटा दूर केला. सॅमसननंतर काही काळ श्रेयस गोपालने चांगली फटकेबाजी केली, पण त्यालाही दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळू शकली नाही. गोपालने दोन चौकारांच्या जोरावर 18 धावा केल्या.

हैदराबादकडून शकिब अल हसन आणि सिद्धार्थ कौल यांनी अचूक मारा करत प्रत्येकी दोन राजस्थानच्या फलंदाजांना माघारी धाडले.

 

11.04 PM : शिखर धवनची तडफदार खेळी; हैदराबादचा राजस्थानवर सहज विजय

10.50 PM : शिखर धवन आणि केन विल्यम्सन यांची दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

- धवन आणि विल्यम्सन यांनी राजस्थानच्या गोलंदाजीवर प्रहार करत शतकी भागीदारी रचली.

10.36 PM : शिखर धवनचे चौकारासह दमदार अर्धशतक

- धवनने आपला फॉर्म कायम राखत 9 चौकार आणि एका षटकारासह अर्धशतक पूर्ण केले.

10.20 PM : शिखर धवन आणि केन विल्यम्सन यांची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

- धवन आणि विल्यम्सन यांनी दमदार फटकेबाजी करत दुसऱ्या विकेटसाठी 28 चेंडूंत 51 धावांची भागीदारी रचली.

10.16 PM : पाच षटकांमध्ये हैदराबादची 1 बाद 45 अशी स्थिती

- वृद्धिमान साहा झटपट बाद झाला असला तरी सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यम्सन यांनी फटकेबाजी करत संघाला 5 षटकांमध्ये 1 बाद 45 अशी मजल मारून दिली.

10.03 PM : हैदराबादला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का; वृद्धिमान साहा OUT

- राजस्थानचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने संघाच्या दुसऱ्याच षटकात हैदराबादच्या साहाला पाच धावांवर बाद केले.

हैदराबाद : आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सलाची 20 षटकांत 9 बाद 125 अशी अवस्था केली. राजस्थानकडून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि बेन स्टोक्स यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण या दोघानांही चांगली फलंदाजी करता आली. संजू सॅमसनन 49 धावांची खेळी साकारल्यामुळे राजस्थानला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

नाणेफेक जिंकत हैदराबादने राजस्थानला फलंदाजीसाठी पाचारण केले. राजस्थानला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. पण त्यानंतर संजू सॅमसनने आक्रमकपणे खेळ करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कर्णधार अजिंक्य रहाणे (13) आणि धडाकेबाज फलंदाज बेन स्टोक्स यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, पण सॅमसन मात्र एका बाजूने धावफलक हलता ठेवण्याचे काम चोख बजावत होता. त्याच्या फलंदाजीमुळेच राजस्थानला दहा षटकांमध्ये 71 धावा करता आल्या.

सॅमसनला अन्य फलंदाजांकडून चांगली साथ मिळत नव्हती. त्यामुळे धावसंख्या वाढवण्याच्या नादात तो बाद झाला. सॅमसनचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले. सॅमसनने पाच चौकारांच्या जोरावर 49 धावांची खेळी साकारली. सामन्याच्या 14व्या षटकात राजस्थानला दोन धक्के दिले ते शकिब अल हसनने. 14व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने राहुलला बाद केले, तर याच षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने हैदराबादच्या मार्गातील सॅमसनचा काटा दूर केला. सॅमसननंतर काही काळ श्रेयस गोपालने चांगली फटकेबाजी केली, पण त्यालाही दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळू शकली नाही. गोपालने दोन चौकारांच्या जोरावर 18 धावा केल्या.

हैदराबादकडून शकिब अल हसन आणि सिद्धार्थ कौल यांनी अचूक मारा करत प्रत्येकी दोन राजस्थानच्या फलंदाजांना माघारी धाडले.

9.36 PM : प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानच्या 125 धावा

- प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानच्या महत्वाच्या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे त्यांना फक्त 125 धावांवरच समाधान मानावे लागले.

9.17 PM : श्रेयस गोपालच्या चौकाराने राजस्थानचे शतक पूर्ण

- राजस्थानच्या श्रेयस गोपालने सोळाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला आणि संघाचे शतक पूर्ण केले.

9.09 PM : राजस्थानला सहावा धक्का 14.4 षटकांत 6 बाद 96 अशी अवस्था

- हैदराबादचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने कृष्णप्पा गौतमला बाद करत राजस्थानला सहावा धक्का दिला.

9.04 PM : संघाचा डाव सावरणारा संजू सॅमसन 49 धावांवर OUT

- राजस्थानचे महत्वाचे फलंदाज बाद होत असताना संजू सॅमसनने संघाचा डाव सावरला होता. पण शकिब अल हसनच्या 14व्या षटकात तो 49 धावांवर बाद झाला.

8.59 PM :  राजस्थानला चौथा धक्का; राहुल त्रिपाठी OUT

- संजू सॅमसनला राहुल त्रिपाठी चांगली साथ देईल असे वाटत होते, पण त्याला फक्त 13 धावाच करता आल्या.

8.45 PM : दहा षटकांत राजस्थान 3 बाद 71

- राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि धडाकेबाज फलंदाज बेन स्टोक्स हे दोघेही बाद झाल्यावर संजू सॅमसनने संघाची बाजू सावरली. संजूने संयतपणे खेळ करत संघाला 10 षटकांमध्ये 71 धावा करून दिल्या, यामध्ये त्याचा 43 धावांता वाटा होता.

8.40PM : राजस्थानला तिसरा धक्का; बेन स्टोक्स OUT

- हैदराबादच्या बिली स्टेनलेकने धडाकेबाज फलंदाज बेन स्टोक्सला बाद करत राजस्थानला तिसरा धक्का दिला. स्टोक्सला यावेळी फक्त 5 धावा केल्या. केन विल्यम्सनने स्टोक्सचा अप्रतिम झेल पकडला.

8.30 PM : राजस्थानला धक्का; अजिंक्य रहाणे OUT

- हैदराबादचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने भेदक मारा करत राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. अजिंक्यने दोन चौकारांच्या जोरावर 13 धावा केल्या.

8.27 PM : राजस्थान रॉयल्सचे अर्धशतक पूर्ण

- अजिंक्यपेक्षा संजू सॅमसनने अधिक आक्रमक खेळ करत सातव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले.

8.19 PM :  राजस्थान रॉयल्सची दमदार सुरुवात; पाच षटकांत 1 बाद 41

- पहिल्याच षटकात राजस्थानला पहिला धक्का बसला. पण त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी संघाला डाव सावरला.

7.58 PM :नाणेफेक जिंकत सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय

- हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक  जिंकली आणि त्याने राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

 



 

दोन्ही संघ

राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, डी'आर्की शॉर्ट, जतिन सक्सेना, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, स्टुअर्ट बिन्नी, हेनरिक क्लासेन, जोस बटलर, प्रशांत चोप्रा, संजू सॅमसन, अंकित शर्मा, अनुरीत सिंह, आर्यमान बिर्ला, बेन लॉघलीन, धवल कुलकर्णी, दुष्मांता चामीरा, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, सुधेशन मिथुन, झहीर खान, डी'आर्की शॉर्ट.

 

सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, मनीष पांडे, रिकी भुई, सचिन बेबी, शिखर धवन, तन्मय अगरवाल, बिपुल शर्मा, कार्लोस ब्रॅथवेट, दीपक हुडा, मेहंदी हसन, मोहम्मद नबी, शाकीब अल हसन, यूसुफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धिमान साहा, बसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलेक, ख्रिस जॉर्डनस, खलिल अहमद, राशिद खान, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, थंगारसू नटराजन.

 

चेंडूशी छेडछाड केल्यामुळे स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना यंदाच्या आयपीएलला मुकावे लागले. आयपीएलमधील त्यांच्या राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना सोमवारी रंगत आहे. स्मिथच्या जागी अजिंक्य रहाणेने राजस्थानची कमान सांभाळली आहे, तर हैदराबादचे कर्णधापद केन विल्यम्सनकडे सोपवण्यात आले आहे. हैदराबादने या सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

Web Title: KXIP vs DD, IPL 2018: Sunrisers' decision to win toss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.