हार्दिक पांड्याला 'भाऊ' म्हणाली अन् ट्रोल झाली ना भाऊ!

टीम इंडियाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याबरोबर फोटो शेअर केल्यानं अभिनेत्री ख्रिस्टल डिसुझा अडचणीत सापडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:53 PM2019-05-06T13:53:04+5:302019-05-06T14:03:12+5:30

whatsapp join usJoin us
Krystle D’Souza gets trolled for her selfie with Hardik Pandya, Aparshakti Khurana gives it back to the haters | हार्दिक पांड्याला 'भाऊ' म्हणाली अन् ट्रोल झाली ना भाऊ!

हार्दिक पांड्याला 'भाऊ' म्हणाली अन् ट्रोल झाली ना भाऊ!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई- टीम इंडियाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याबरोबर फोटो शेअर केल्यानं अभिनेत्री ख्रिस्टल डिसुझा अडचणीत सापडली आहे. इन्स्टाग्रामवर ख्रिस्टलनं पांड्याबरोबरचा फोटो पोस्ट केल्यानं ती ट्रोल झाली. ट्रोलर्सनी ख्रिस्टलला कमेंट करून धारेवर धरलं आहे. त्याला ख्रिस्टलनंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ख्रिस्टल डिसुझानं सोशल मीडियावर हार्दिक पांड्याबरोबर एक फोटो शेअर केला. या फोटोबरोबर ख्रिस्टल डिसुझा लिहिते, माझ्या भावासारखा कोणीच हार्ड इच (हार्दिक) नाही. फोटोच्या खाली ख्रिस्टलनं 'ब्रदर फ्रॉम अनदर मदर' हे हॅशटॅग वापरलं आहे.

ख्रिस्टलच्या या फोटोवरून ती ट्रोल झाली. ट्रोलर्सनी तिच्या फोटोवर अश्लील कमेंट केल्या आहेत. दुसरीकडे अली अवराम, ईशा गुप्ताशिवाय हार्दिक पांड्याची ख्रिस्टल डिसूझाबरोबरच्या अफेअर्सची चर्चा होती. ख्रिस्टलच्या या पोस्टवर बॉलिवूड अभिनेता अपारशक्तीनं ट्रोलर्सच्या कमेंट वाचून त्यावर प्रतिक्रिया दिली. अपारशक्ती लिहितो, हार्दिक पांड्या हा एक चांगला क्रिकेटर आणि परफॉर्मर आहे. वर्ल्ड कपपूर्वी कोणीही अशा प्रकारची चर्चा करू नये.

त्यानंतर अपारशक्तीच्या कमेंटला रिट्विट करत ख्रिस्टल डिसूझा लिहिते, लोक किती स्वार्थी आणि घाणेरडे असतात. त्यांना वाटतं ते काहीही लिहितील आणि लिहून झाल्यावर वाचतील. मला वाटतं कधी कधी दुर्लक्ष करणं चांगलं असतं. ट्रोलर्सच्या या कमेंट्सनी हार्दिकच्या परफॉर्मन्सवर कोणताही फरक पडणार नसल्याचंही ख्रिस्टलनं सांगितलं आहे. 

Web Title: Krystle D’Souza gets trolled for her selfie with Hardik Pandya, Aparshakti Khurana gives it back to the haters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.