KKRvMI, IPL 2018 : मुंबई चौथ्या स्थानी विराजमान; कोलकात्यावर मोठा विजय

मुंबई इंडियन्सचे आव्हान संपले, अशी टीका करणाऱ्यांना रोहित शर्माच्या सेनेने बुधवारी चोख उत्तर दिले. मुंबईच्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव 108 धावावर संपुष्टात आला आणि मुंबईने 102 धावांनी मोठा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 07:39 PM2018-05-09T19:39:18+5:302018-05-10T09:21:44+5:30

whatsapp join usJoin us
KKRvMI, IPL 2018 LIVE: Mumbai's first batting against Kolkata | KKRvMI, IPL 2018 : मुंबई चौथ्या स्थानी विराजमान; कोलकात्यावर मोठा विजय

KKRvMI, IPL 2018 : मुंबई चौथ्या स्थानी विराजमान; कोलकात्यावर मोठा विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देया विजयासह मुंबईने 10 गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे.

मुंबई चौथ्या स्थानी विराजमान; कोलकात्यावर मोठा विजय

कोलकाता : मुंबई इंडियन्सचे आव्हान संपले, अशी टीका करणाऱ्यांना रोहित शर्माच्या सेनेने बुधवारी चोख उत्तर दिले. इशान किशनच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना कोलकात्यापुढे 211 धावांचे आव्हान ठेवले होते. किशनने 21 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 62 धावांची तुफानी खेळी साकारली. मुंबईच्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव 108 धावावर संपुष्टात आला आणि मुंबईने 102 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह मुंबईने 10 गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. त्याचवेळी कोलकाताची एका स्थानाने पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.
इडन्स गार्डन्स स्टेडियमवर नाणेफेक जिंकून कोलकाता कर्णधार दिनेश कार्तिक याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतु, इशानने त्याचा निर्णय चुकीचा ठरवताना २१ चेंडूत ६२ धावांचा झंझावात सादर केला. त्याच्या जोरावर मुंबईने २० षटकात ६ बाद २१० धावांचा एव्हरेस्ट उभारला. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान कोलकाताचा डाव १०८ धावांवर संपुष्टात आला. सलामीवीर ख्रिस लिन (२१), नितीश राणा (२१) आणि तळाच्या फळीतील टॉम कुरन (१८) यांच्या शिवाय इतर कोणताही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांपुढे तग धरु शकला नाही. डावातील दुसºयाच चेंडूवर सुनिल नरेन (४) बाद झाल्यानंतर कोलकाताच्या फलंदाजीला गळती लागली. कृणाल - हार्दिक या पांड्या बंधूनी प्रत्येकी २ बळी घेत कोलकाताला रोखले.
तत्पूर्वी, इशान किशनने केवळ २१ चेंडूत ५ चौकार व ६ षटकारांसह ६२ धावांचा तडाखा दिला. त्याने चायनामन कुलदीप यादवच्या एकाच षटकात २५ धावा चोपताना त्याची लय बिघडवली. सुनिल नरेनने त्याला बाद केले खरे, परंतु तोपर्यंत मुंबईकर मजबूत स्थितीत आले होते. त्यापुर्वी, सूर्यकुमार यादवने
३२ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ३६ धावा केल्या. इशान बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (३६) आणि हार्दिक पांड्या (१९) यांच्या संथ खेळीमुळे मुंबईला भलीमोठी मजल मारता आली नाही. परंतु, बेन कटींगने अखेरच्या काही षटकांमध्ये चौफेर फटकेबाजी करताना ९ चेंडूत १ चौकार व ३ षटकारांसह २४ धावांचा चोप देत मुंबईला दोनशेच्या पलीकडे नेले. कोलकाताचा पियूष चावलाने ३ बळी घेतले असले तरी तो अत्यंत महागडा ठरला. (वृत्तसंस्था) 

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स : २० षटकात ६ बाद २१० धावा (इशान किशन ६२, रोहित शर्मा ३६, सूर्यकुमार यादव ३६; पियूष चावला ३/४८.) वि.वि. कोलकाता नाइट रायडर्स : १८.१ षटकात सर्वाबाद १०८ धावा (ख्रिस लिन २१, नितिश राणा २१; कृणाल पांड्या २/१२, हार्दिक पांड्या २/१६.)

 

 

11.27 PM : मुंबईचा कोलकात्यावर 102 धावांनी मोठा विजय

11.23 PM : कोलकात्याला नववा धक्का; टॉम कुरन बाद

- मुंबईचा फिरकीपटू कृणाल पंड्याने टॉम कुरनला बाद करत कोलकात्याला नववा धक्का दिला. कोलकाता 17 षटकांत 9 बाद 106.

11.19 PM : कोलकात्याचे चौकारासह सोळाव्या षटकात शतक पूर्ण

- टॉम कुरनने सोळाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत संघाचे शतक पूर्ण केले.

11.10 PM : कोलकात्याला आठवा धक्का; पीयुष चावला बाद

- मुंबईच्या बेन कटिंगने पीयुष चावलाला बाद करत कोलकात्याला आठवा धक्का दिला. चावलाने 11 धावा केल्या. 

10.54 PM : कोलकात्याला सातवा धक्का; रींकू सिंग बाद

- जसप्रीत बुमराने अकराव्या षटकात रींकू सिंगला बाद करत कोलकात्याला सातवा धक्का दिला. कोलकाता 11 षटकांत 7 बाद 77.

10.50 PM : कोलकात्याला सहावा धक्का; नीतीश राणा बाद

- दहाव्या षटकात दिनेश कार्तिकनंतर नीतीष राणाच्या रुपात कोलकात्याला सहावा धक्का बसला.

10.45 PM : दिनेश कार्तिक OUT ; कोलकात्याला पाचवा धक्का

- कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकने धावचीत होत आत्मघात केला. कार्तिकला पाच धावा करता आल्या.

10.37 PM : आंद्रे रसेल बाद; कोलकात्याला मोठा धक्का

10.32 PM : कोलकात्याला तिसरा धक्का; रॉबिन उथप्पा बाद

- मयांक मार्कंडने रॉबिन उथप्पाला बाद करत कोलकात्याला दुसरा धक्का. उथप्पाने दोन षटकारांच्या जोरावर 14 धावा केल्या.

10.19 PM : ख्रिस लिन बाद; कोलकात्याला दुसरा धक्का

- ख्रिस लिनने धावचीत होत आत्मघात केला. लिनने 15 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 21 धावा केल्या.

10.08 PM : शाहरुख खानला आले मुंबईच्या धावांचे टेंशन, पाहा फोटो...



 

10.03 PM :  कोलकात्याला पहिला धक्का; सुनील नरिन बाद

- डावाच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावत नरिनने झोकात सुरुवात केली खरी, पण दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला. 

कोलकात्यात किशनचे तुफान; मुंबईचा 210 धावांचा डोंगर

कोलकाता : इडन गार्डन्सवर बुधवारी मुंबई इंडियन्सच्या  इशान किशनचे धावांचे तुफान आले आणि त्यापुढे कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांना नतमस्तक व्हावे लागले. इशानने 21 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 62 धावांची वादळी खेळी साकारली आणि या खेळीच्या जोरावरच मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 210 धावांचा डोंगर उभारता आला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी यावेळी प्रत्येकी 36 धावांची खेळी साकारली. अखेरच्या षटकांमध्ये बेन कटिंगने जोरदार फटकेबाजी करत 9 चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 24 धावा फटकावल्या.

9.45 PM : मुंबईचे कोलकात्यापुढे 211 धावांचे आव्हान

9.44 PM : मुंबईला सहावा धक्का; बेन कटिंग बाद

9.40 PM : बेन कटिंगचे सलग दोन षटकार ; मुंबईच्या दोनशे धावा पूर्ण

9.35 PM :  मुंबईला मोठा धक्का; रोहित शर्मा बाद

- रोहित शर्माने मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली. मुंबईला हा मोठा धक्का होता. रोहितने 36 धावा केल्या.

9.32 PM : हार्दिक पंड्या बाद; मुंबईला चौथा धक्का

- अठराव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात पंड्या बाद झाला, त्याने 13 चेंडूंत दोन षटकारांच्या जोरावर 19 धावा केल्या.

9.26 PM : मुंबई 17 षटकांत 3 बाद 162

9.12 PM : इशान किशनच्या फटकेबाजीवर रोहित आणि आकाश अंबानी खूष... पाहा व्हीडीओ



 

9.11 PM : इशान किशनची 21 चेंडूंतील 62 धावांची खेळी अखेर संपुष्टात

- इशान किशनचे फटक्यांचे वादळ अखेर कोलकात्याने शमवले. सुनील नरिनने किशनला रॉबिन उथप्पाकरवी झेलबाद केले. किशनने 21 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 62 धावांची तुफानी खेळी साकारली.

9.06 PM : इशान किशनचे षटकारांच्या हॅट्ट्रिकसह 17 चेंडूंत अर्धशतक

- सलग तीन षटकार लगावत इशान किशनने 17 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. कुलदीप यादवच्या 14व्या षटकात चार षटकारांसह इशानने 25 धावांची लूट केली.

9.03 PM : रोहित शर्माला आणि इशान किशन यांची अर्धशतकी भागीदारी

- रोहित शर्माला आणि इशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 27 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी रचली. मुंबई 13 षटकांत 2 बाद 112.

8.56 PM :  रोहित शर्माला 10 धावांवर असताना जीवदान

- आंद्रे रसेलच्या 12 व्या षटकात नीतीश राणाने रोहित शर्माचा झेल सोडला. त्यावेळी रोहित दहा धावांवर होता.

8.50 PM : मुंबई 11 षटकांत 2 बाद 82

8.39 PM : मुंबईला मोठा धक्का; सूर्यकुमार यादव बाद

8.30 PM : इव्हिन लुईस बाद झाल्यावर रोहित शर्मा फलंदाजीला उतरला

8.28 PM : मुंबईला पहिला धक्का; इव्हिन लुईस बाद

- पीयुष चावलाने इव्हिन लुईसला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. लुईसने तीन चौकारांच्या जोरावर 18 धावा केल्या.

8.21 PM : मुंबई पाच षटकांत बिनबाद 37

8.07 PM : सूर्यकुमार यादवचा मुंबईसाठी पहिला षटकार

- दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने षटकार लगावला. मुंबईसाठी हा पहिला षटकार ठरला.

8.01 PM : सूर्यकुमार यादवने मुंबईची चौकाराने केली सुरुवात

- सूर्यकुमार यादवने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार लगावत मुंबईला झोकात सुरुवात करून दिली.

7.46 PM : दोन्ही संघ कसा करतायत सराव, पाहा हा व्हीडीओ...



 

7.33 PM : कोलकात्याने शुभमन गिल आणि मिचेल जॉन्सनला वगळले; मुंबईच्या संघात बदल नाही

7.30 PM : कोलकात्याने नाणेफेक जिंकत मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले



 

बाद फेरीत पोहोचण्यासाठी मुंबईला विजय आवश्यक; आज कोलकाताविरुद्ध सामना
कोलकाता : आयपीएल आता अशा वळणावर येऊन ठेपली आहे की सर्व संघांनाच बाद फेरीचे वेध लागले आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सध्या गुणतालिकेत आठ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातील विजय मुंबईला बाद फेरीच्या दिशेने जाण्यासाठी महत्वाचा असेल. दुसरीकडे कोलकाताचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झालेला नाही. त्यामुळे या सामन्यातील विजयासह कोलकात्याचा संघ 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतो.

दोन्ही संघ

 



 



 

Web Title: KKRvMI, IPL 2018 LIVE: Mumbai's first batting against Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.