जेनिंग्सचे शतक, श्रीलंकेला अवघड लक्ष्य, तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचे पारडे जड

कीटोन जेनिंग्सच्या शतकामुळे इंग्लंडने श्रीलंकेला पहिल्या कसोटीत गुरुवारी विजयासाठी ४६२ धावांचे अवघड आव्हान दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 01:55 AM2018-11-09T01:55:07+5:302018-11-09T01:55:14+5:30

whatsapp join usJoin us
Janeings' century, a difficult target for Sri Lanka, at the end of the third day | जेनिंग्सचे शतक, श्रीलंकेला अवघड लक्ष्य, तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचे पारडे जड

जेनिंग्सचे शतक, श्रीलंकेला अवघड लक्ष्य, तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचे पारडे जड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गॉल : कीटोन जेनिंग्सच्या शतकामुळे इंग्लंडने श्रीलंकेला पहिल्या कसोटीत गुरुवारी विजयासाठी ४६२ धावांचे अवघड आव्हान दिले आहे. जेनिंग्सच्या १४६ धावांमुळे इंग्लंडने ६ बाद ३२२ धावांवर दुसरा डाव घोषित केला. तिसºया दिवशी खेळ थांबला त्यावेळी लंकेने बिनबाद १५ अशी वाटचाल केली होती. दिमूथ करुणारत्ने ७ आणि कौशल सिल्वा ८ नाबाद होते. सकाळच्या सत्रात रोरी बर्न्स २३ धावांवर बाद झाला.

मोईन अली याला रंगना हेरथने मिडआॅनवर दिलरुवान परेराकरवी झेलबाद केले. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट (३) हादेखील अपयशी ठरला. बेन स्टोक्सने ८३ चेंडूत तीन षटकारांसह ६२ धावा केल्या. चहापानानंतर तो परेराचा बळी ठरला. बटलर(३५) हेरथचा बळी ठरला तर बेन फॉक्स याला अकिला धनंजयने फिरकीच्या जाळ्यात ओढले.इंग्लंडने आज उपाहारापर्यंत दुसºया डावात आघाडी २५० धावांपर्यंत पोहोचविली.(वृत्तसंस्था)
 

Web Title: Janeings' century, a difficult target for Sri Lanka, at the end of the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.