IPL 2019 : मुंबई इंडियन्स 'हुकुमी एक्का' मैदानात उतरवणार, CSKची चिंता वाढणार

IPL 2019 : चेन्नईच्या फिरकीचा सामना करण्यासाठी मुंबई उतरवणार स्फोटक फलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 12:55 PM2019-05-12T12:55:48+5:302019-05-12T12:56:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 : Will Mumbai Indians spring a surprise with Yuvraj singh in the IPL final? | IPL 2019 : मुंबई इंडियन्स 'हुकुमी एक्का' मैदानात उतरवणार, CSKची चिंता वाढणार

IPL 2019 : मुंबई इंडियन्स 'हुकुमी एक्का' मैदानात उतरवणार, CSKची चिंता वाढणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स ही ड्रीम फायनल आज हैदराबाद येथे होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघांनी तोडीस तोड कामगिरी करत इथवर मजल मारली आहे. या सामन्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा कॅप्टन कून महेंद्रसिंग धोनी आणि हिटमॅन रोहित शर्मा यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. आयपीएलच्या 12व्या मोसमात जेतेपदाचा चषक उंचावणारा संघ हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी प्रत्येकी तीन वेळा जेतेपदाचा चषक उंचावला आहे आणि आज जो संघ बाजी मारेल त्याच्या नावावर सर्वाधिक जेतेपद नोंदवली जाणार आहेत. या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 'हुकुमी एक्का' मैदानात उतरवण्याचे संकेत दिले आहेत.
 





मुंबई इंडियन्स आमि चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएलच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा समोरासमोर येणार आहेत. चेन्नईने 2010 मध्ये मुंबईच्या डी वाय पाटिल स्टेडियमवर मुंबईला 22 धावांनी नमवून जेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2013 मध्ये मुंबईने कोलकाताच्या इडन गार्डन्सवर चेन्नईचा 23 धावांनी, तर 2015 मध्ये कोलकातावरच चेन्नईचा 41 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता चेन्नईविरुद्ध मुंबई जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करतो की चेन्नई जेतेपदाच्या शर्यतीत बरोबरी करतो याची उत्सुकता आहे. चेन्नईने आयपीएलमध्ये सर्वाधिक 8 वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्स पाचव्यांदा फायनल खेळणार आहे.


 या दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामात एकूण 19103 धावा केल्या आहेत आणि यात 769 षटकार व 1633 चौकारांचा समावेश आहे. त्यासह गोलंदाजीत त्यांनी 666 विकेट्स घेतल्या आहेत. 


या सामन्यात मुंबई इंडियन्स युवराज सिंगला संधी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युवीनं शनिवारी नेट्समध्ये कसून सरावही केला. 1 कोटीच्या मुळ किमतीत युवीला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतल्यानंतर मुंबईनं त्याला फार संधी दिलेली नाही. मुंबईकडून प्रथमच आयपीएलमध्ये खेळताना युवीनं 4 सामन्यांत 130.66च्या सरासरीनं 98 धावा केल्या आहेत. त्यात त्यानं 53 धावांची तुफान खेळी केली होती. चेन्नईच्या फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी मुंबई युवीला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. 



संभाव्य संघ
चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्रसिंग धोनी (कणर्धार), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, शेन वॅटसन, फॅफ डू प्लेसिस, मुरली विजय, रविंद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन ब्रेव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिशेल सॅन्टनर, शार्दुल ठाकुर, मोहित शर्मा, केएम असिफ, दीपक चहर, एन. जगदीशन, स्कॉट कगलेईन.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कणर्धार), क्विन्टॉन डी कॉक, सुयर्कुमार यादव, युवराज सिंग, केरॉन पोलार्ड, हार्दिक पंडया, कृणाल पंडया, मिशेल मॅकक्लॅघन, मायंक मार्कंडे, राहुल चहर, जसप्रित बुमराह, अनमोलप्रित सिंग, सिद्धेश लाड, अंकुल रॉय, इव्हिन लुईस, पंकज जैस्वाल, बेन कटिंग, इशान किशन, आदित्य तरे, रसिक सलाम, बरिंदर सरण, जयंत यादव, ब्यूरन हेन्ड्रिक्स, मलिंगा.

Web Title: IPL 2019 : Will Mumbai Indians spring a surprise with Yuvraj singh in the IPL final?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.