IPL 2019 : फायनलपूर्वी रोहित शर्माची उजळणी, मुंबई इंडियन्सच्या 'थ्री पिलर्स'चे मानले आभार

IPL 2019 : मुंबई इंडियन्स आमि चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएलच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा समोरासमोर येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 03:04 PM2019-05-12T15:04:01+5:302019-05-12T15:04:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 : Rohit Sharma Rewinds Mumbai Indians title wins ahead of final match against CSK | IPL 2019 : फायनलपूर्वी रोहित शर्माची उजळणी, मुंबई इंडियन्सच्या 'थ्री पिलर्स'चे मानले आभार

IPL 2019 : फायनलपूर्वी रोहित शर्माची उजळणी, मुंबई इंडियन्सच्या 'थ्री पिलर्स'चे मानले आभार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आमि चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएलच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा समोरासमोर येणार आहेत. या दोन्ही संघांच्या नावावर प्रत्येकी तीन आयपीएल जेतेपद आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र मुंबई इंडियन्सचे नाणे खणखणीत वाजले आहे. त्यांनी चेन्नई सुपर किंग्सला तीनही सामन्यांत पराभवाची चव चाखवली आणि फायनलमध्येही तसेच होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चांगलीच उजळणी केली आहे. त्याने मुंबई इंडियन्सच्या मागील तीन जेतेपदांमधील अविश्वसनीय क्षण सांगितले आणि संघाच्या थ्री पिलर्सचेही आभार मानले.



चेन्नईने 2010 मध्ये मुंबईच्या डी वाय पाटिल स्टेडियमवर मुंबईला 22 धावांनी नमवून जेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2013 मध्ये मुंबईने कोलकाताच्या इडन गार्डन्सवर चेन्नईचा 23 धावांनी, तर 2015 मध्ये कोलकातावरच चेन्नईचा 41 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता चेन्नईविरुद्ध मुंबई जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करतो की चेन्नई जेतेपदाच्या शर्यतीत बरोबरी करतो याची उत्सुकता आहे. चेन्नईने आयपीएलमध्ये सर्वाधिक 8 वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्स पाचव्यांदा फायनल खेळणार आहे.  या दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामात एकूण 19103 धावा केल्या आहेत आणि यात 769 षटकार व 1633 चौकारांचा समावेश आहे. त्यासह गोलंदाजीत त्यांनी 666 विकेट्स घेतल्या आहेत. 




अंतिम फेरीत चेन्नई व मुंबईचे संघ यंदाच्या जेतेपदासाठी निर्धाराने मैदानात उतरतील. इम्रान ताहीर, हरभजन सिंग व रविंद्र जडेजा या त्रिकुटाने प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणले असले तरी मुंबई इंडियन्सनी या तिघांचा यशस्वीरित्या सामना केला आहे. त्या पाश्वर्भूमीवर आजची लढत विशेष रंगतदार ठरु शकते.



संभाव्य संघ
चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्रसिंग धोनी (कणर्धार), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, शेन वॅटसन, फॅफ डू प्लेसिस, मुरली विजय, रविंद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन ब्रेव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिशेल सॅन्टनर, शार्दुल ठाकुर, मोहित शर्मा, केएम असिफ, दीपक चहर, एन. जगदीशन, स्कॉट कगलेईन.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कणर्धार), क्विन्टॉन डी कॉक, सुयर्कुमार यादव, युवराज सिंग, केरॉन पोलार्ड, हार्दिक पंडया, कृणाल पंडया, मिशेल मॅकक्लॅघन, मायंक मार्कंडे, राहुल चहर, जसप्रित बुमराह, अनमोलप्रित सिंग, सिद्धेश लाड, अंकुल रॉय, इव्हिन लुईस, पंकज जैस्वाल, बेन कटिंग, इशान किशन, आदित्य तरे, रसिक सलाम, बरिंदर सरण, जयंत यादव, ब्यूरन हेन्ड्रिक्स, मलिंगा.

सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून.

Web Title: IPL 2019 : Rohit Sharma Rewinds Mumbai Indians title wins ahead of final match against CSK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.