IPL 2019 : जशास तसे; चेन्नईच्या पराभवानंतर ICCनं घेतली धोनीची फिरकी

IPL 2019 : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना जवळपास खिशात घातलाच होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:01 PM2019-04-22T17:01:31+5:302019-04-22T17:04:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 : MS Dhoni gets a taste of his own mastery, ICC coment on CSK lost against RCB | IPL 2019 : जशास तसे; चेन्नईच्या पराभवानंतर ICCनं घेतली धोनीची फिरकी

IPL 2019 : जशास तसे; चेन्नईच्या पराभवानंतर ICCनं घेतली धोनीची फिरकी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू, आयपीएल 2019 : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं आपला अनुभव पणाला लावताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना जवळपास खिशात घातलाच होता. मात्र, अखेरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला दोन धावांचा फटका मारता आला नाही आणि पार्थिव पटेलने यष्टिमागून अचूक निशाणा साधत शार्दूल ठाकूरला धावबाद केले. पटेलच्या या थ्रोने चेन्नई सुपर किंग्सला एका धावेने हार मानण्यास भाग पाडले. चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील या थरारनाट्याची दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही ( आयसीसी) घेतली. त्यांनी एका विजयी थ्रोची आठवण करून देताना धोनीची फिरकी घेतली. 

23 मार्च 2016च्या आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील तो सामना होता. भारत आणि बांगलादेश यांच्यातील ती लढत बंगळुरू येथे खेळवण्यात आली होती. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात बांगलादेशचे 8 फलंदाज 147 धावांवर माघारी परतले होते. तीन चेंडूंत दोन धावांची गरज असताना त्यांचे दोन फलंदाज लागोपाठ माघारी परतले. त्यामुळे सामना 1 चेंडूत दोन धावा असा अटीतटीचा झाला. हार्दिक पांड्याने शेवटचा चेंडू टाकला आणि त्यावर बांगलादेशच्या खेळाडूला फटका मारता आला नाही. चेंडू यष्टिरक्षक धोनीच्या हातात गेला, परंतु नॉन स्ट्रायकरवरील फलंदाज धाव घेण्यासाठी पळाला. धोनीनं यष्टिंच्या दिशेने धाव घेताना बांगलादेशच्या फलंदाजाला धावबाद केले. भारताने एका धावेने हा सामना जिंकला. 



तीन वर्षांनंतर बंगळुरूतच इंडियन प्रीमिअर लीगच्या सामन्यात हीच अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु यावेळी धोनी पराभूत संघाकडून होता आणि अखेरच्या शेवटच्या चेंडूवर धोनीच स्ट्राइकवर होता. त्यावरून आयसीसीनं धोनीची फिरकी घेतली. बंगळुरूने ठेवलेल्या 162 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचे आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात माघारी परतले. त्यांना अखेरच्या षटकात 26 धावांची गरज होती. धोनीनं पहिल्या पाच चेंडूंत 24 धावा चोपल्या. पण, अखेरच्या चेंडूवर त्याला बरोबरीची धाव घेता आली नाही. पटेलने शार्दूल ठाकूरला धावबाद करत बंगळुरूला विजय मिळवून दिला. 

पाहा व्हिडिओ..



 

Web Title: IPL 2019 : MS Dhoni gets a taste of his own mastery, ICC coment on CSK lost against RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.